Home

https://geetalankar.blogspot.com/?m=1

शिक्षण ... नका करा शाळा बंद | school |

 शिक्षणाची नका कापू नाळ....    बालकांचे होईल फार हाल....


शासनाने १४००० च्यावर लहान शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेत आहे. विद्यार्थ्यांसाठी हा फारच कठीण निर्णय  राहणार आहे.

मी गेल्या १९ वर्षांपासून जिल्हा परिषद शाळेत काम करत आलोय. जेव्हा लागलो होतो तेव्हा शाळेत फक्त बंद  पडलेला टु इन वन (रेडीओ + टेपरेकॉर्डर ) होता.
         अशा शाळेत २००५ ला पहिल्यांदा २ संगणक आले व ती शाळा डिजिटल होत विद्यार्थ्यांना जगाशी जोडणी झाली .
School


पुढे थांबायच नव्हतं नविन स्वरूपाचे प्रशस्त डिजिटल क्लासरुम उभारणी करण्यात वाटचाल सुरु केली . शाळा फक्त डिजिटलच नव्हे तर ग्रीन स्कूल मिशन सुंदर शाळा अशी माझी शाळा पुर्णत:  सोलार ऊर्जेवर चालणारे जिल्ह्यातील आणखी शाळेंना मार्गदर्शक ठरले २०१२ - २०१८ या काळातच  माझ्या लहानशा शाळेने छ. संभाजीनगर जिल्ह्यातील ४८ शाळेंना डिजिटल होण्यात व यातील १७ या सोलार ऊर्जेवर होण्यास प्रेरित केले. हे सर्व होत असतांना समाज सहभाग महत्त्वाचा ठरला.
     शाळेच्या परिसरात किंवा गावात एक असा शिक्षण प्रेमी असतोच जो पुर्ण रान पेटवतो नेमके अशाच व्यक्तीला माझ्या शाळेच्या भेटीत आणावा असा आग्रह संबंधित शाळेच्या शिक्षकांना असायचा. व मनी जसे तसे प्रत्यक्षात चित्र बदलतांना पाहून निश्चितच खूपच आशादायी व फलदायी बाब होत होती. पुढे हा प्रवास राज्यभर डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र या राज्यस्तरीय तथा कर्नाटकातील मराठी भाषिक बेळगांव जिल्ह्या पर्यंत असा १८ हजार शिक्षक  व १५ हजार शाळेच्या जोडणीने बनू शकला.
    शिक्षकांना डिजिटल कन्टेट उपलब्ध झाले, शैक्षणिक पीडीएफ , व्हिडीओ तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट ते होऊ लागले. मी कल्पित केलेल्या एका विचाराची व्याप्ती इतकी व्यापक होईल ही कधी कल्पनाही केलेली  नव्हती .
      पुढे कोरोना ची चाहूल भारतात झाली मार्च २०२० चे लाॕकडाऊन पडले तेव्हा मनात वेगळी भिती निर्माण झाली या ग्रामीण भागातील शिक्षणाचे काय होणार. मे २०२० ला हेडगेवार हॉस्पिटलची संस्था सावित्रीबाई फुले महिला एकात्म मंडळ यांच्या सहयोगाने शिक्षकांना आत्मबळ मिळण्यासाठी व विद्यार्थ्यांना लाॕकडाऊन काळात शिक्षण या हेतूने राज्यस्तरीय शैक्षणिक कविता गायन स्पर्धा घेतली. यात गायन व कवितेचा आशय स्पष्ट होणारे १२० व्हिडीओ १ ली ते १० वी विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊन राज्याच्या लाखो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला.
       मी स्वतः ज्या शाळेत आज काम करत आहे. ती फारच दुर्गम डोंगर भागातील शाळा असून अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य आपण साजरा जरी केला असला तरी वाडीपर्यंत अजूनही रस्ता नाही वाडी सोडा गावात ही रस्ता होऊ शकलेला नाही. अशा दुर्लक्षित मुरूमखेडावाडी शाळा सोलारयुक्त डिजिटल होत येथील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची दारे उघडी होऊ शकली. शाळेतील आमचे आधुनिक शिक्षणात रोबोटिक्स कार, फ्लाॕईंग ड्रोन प्रात्यक्षिक, डिझाईन फाॕर चेंजचे उपक्रम ,
हे सर्व करत असतांना अल्प निधी ही समस्या जरी होती वेळ प्रंसगी तो आर्थिक भार आम्ही शिक्षकांवर येत होताच याच बरोबरीने कित्येक काम शाळा सुटल्यावर श्रमदानातून घामाने व वेळप्रसंगी रक्त ही सांडले( येथे कोणास मारहाण  नव्हे तर काम करतांना झालेली वैयक्तिक इजा)
इतके काही करत असतांना २०१८ नंतर सर्व शिक्षा अभियान थांबले व समग्र  अंतर्गत शाळेंना पटसंख्या आधारित निधी सुरु झाला. लहान शाळेंना केवळ ५००० रू इतका अल्पसा निधी मिळू लागला . व नेमका २० पटा आतील शाळा बंद करण्यास जणू हाच मुद्दा कारणीभूत ठरतोय की काय असे वाटते. सन २००० नंतर सर्व शिक्षा अभियान आले. यात लहान शाळेंना वार्षिक ७५०० रु दुरुस्ती,  ५००० रू शाळा अनुदान तर शिक्षक अनुदान स्वरूपात १००० रु असे एकूण १३५००/- सरसकट मिळत. या तुलनेत आज सन २०२३ महागाई स्वरूप पाहिल्यास केवळ ५००० रू एक संस्था वर्षभर गुणवत्ता पुर्ण कशी चालू शकेल ? हा ही प्रश्न फार महत्त्वाचा म्हणावा लागेल .
शाळा व शिक्षण  हे आपल्या देशात खर्च म्हणून पाहणे हे फारच दुर्देवी आहे. मुळात हे खर्च नसून ही उदयाची विकसित भारत निर्माण होण्यासाठीची फार मोठी गुंतवणूक असणार आहे.
    काहीही झाले तरी या ग्रामीण लेकरांचा हक्क हिरावून घेऊ नका. त्यांना त्यांच्या अंगणात मिळत असलेले शिक्षण परके करू नका. एक जरी मुलगा शिक्षणातून वंचित होऊन तो गुन्हेगार बनून समाज विध्वंसक बनला व तुरुंगात टाकून त्याला सांभाळायचा खर्च हा आज देण्यात येणाऱ्या शिक्षणापेक्षा निश्चितच जास्त असणार आहे.
   माझी सर्व राजकीय मंडळीना एक विनंती आहे. असे शिक्षण उदासीन होणारे निर्णय कृपया घेऊ नका....

आज बळ आले अखेर या शिक्षणाने देशात सर्वांना,
सोसून गुलामीचे घाव होतो अनुभवा स्वातंत्र्य सुखांना...

    प्रकाशसिंग राजपूत
        सहशिक्षक
छ. संभाजीनगर

सेवानिवृत्ती सोहळा retirement programme

 टापटीप माणसाचा टापटीप सेवापूर्ती समारंभ

 दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी करमाड केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री अशोक बनकर दादा हे नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. आजचा त्यांचा सेवापूर्ती सोहळा अविस्मरणीय अशा पद्धतीने साजरा झाला.

retirement programme 

कविता लेखन व स्वर  प्रकाशसिंग राजपूत 



केंद्रातील प्रत्येक शाळेने दादा बद्दल आपले मनोगत व्यक्त केले आणि भरभरून बोलले. दादा एखाद्या व्यक्ती ला एवढे प्रेम मिळणे ही खरोखरच भाग्याची गोष्ट आहे आणि आपण खरंच भाग्यवान आहात आणि आम्ही सगळे सुद्धा कारण भरभरून प्रेम करायला समोरची व्यक्तीही त्या पात्रतेची असावी लागते. 

आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती हे आपल्या कामापुरता बघत असते परंतु आज जे सर्व शिक्षक गण बोलले ते खरोखरच मनापासून होते

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपल्या केंद्रातील सर्व शिक्षकांनी खूप मेहनत घेतली आणि कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भोजन व्यवस्था उत्तम होती.


आदरणीय श्री संजय निकम सर उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन खूप खूप अभिनंदन💐💐💐

बालभारती सर्वेक्षण

 महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती, पुणे 


यांच्या माध्यमातून वह्यांच्या पानांचा समावेश करून इयत्ता १ली ते ८वी साठी मराठी, इंग्लिश, हिंदी, उर्दू या माध्यमांसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तके तयार केलेली आहेत. दिनांक ८ मार्च २०२३च्या शासन निर्णयानुसार या पाठ्यपुस्तकांतील वह्यांच्या पृष्ठांबाबतची उपयोगिता व यशस्विता तपासण्यासाठी ही सर्वेक्षण लिंक तयार करण्यात आलेली आहे. या लिंकवर शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी प्रश्नावली उपलब्ध आहे. या प्रश्नावलीच्या माध्यमातून आपण आपले प्रतिसाद नोंदवावेत ही विनंती. ही लिंक ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सुरू  राहणार आहे. 

खालील लिंकवर जाऊन आपण प्रश्नावली भरु शकता...


https://ebalbharati.in/ETFeedback