Home

https://geetalankar.blogspot.com/?m=1

रंग उधळत... नविन काव्यरचना

 🟣🟡 रंग उधळत...🔵🔴



प्रीत जणू या रंगास प्रेमाची,

उधळता हर्ष यातून नवा घडे,

अलगद देत गती जीवनास,

पाऊलोपाऊली आंनदाचे सडे,



थट्टा लहान्यांची मुक्तांगणी,

पाखरांची झेप नभी भारी,

चाहुल ही सुखद क्षणांची ,

विसरून सारं दुःख हारी,



बहरुन ही मनाचं सार रान,

ओढ लागली त्यासी स्नेहाची,

कडी ही जुळत खरी मैत्रीची,

दंग जरी चाले वाट जीवनाची,



आरोहात आज सारा स्वर,

मुक्त पाट दबल्या दुःखाचा ,

धन्यता ही याच सणाची,

रंग उधळत खरं जगण्याचा...



   ✒️ *प्रकाशसिंग राजपूत*✒️

           औरंगाबाद 

📲 9960878457

सावित्रीबाई फुले विद्येची खरी दैवत...#savitribai,

 


*विद्येची खरी दैवत...*




शिक्षणज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिवशी लिहिलेली रचना आपल्यासाठी सादर करत आहे.*


*घडविली स्त्री शिक्षणाची नवी कहाणी ,*

*सावित्रीमाई विद्येची खरी दैवत आम्ही जाणी....,*



*अनिष्ट परंपरा विरोधात देवून  लढा विरोधातून ,*

*जागवला समाज भान लेकीच्या शिक्षणातून,*



*काळ तो विपरित ध्येय माय तु गाठला,*

*भिडे वाडयात  स्त्री शिक्षण थाटला.....*



*अन्यायाचा अंधार एकदाचा मिटविला,*

*स्त्री जन्माचा नवा अध्याय दाखविला.....*



*पाखंड होता येथे  सारा माजलेला,*

*दृष्टान्त नवा घडला चौफेर गाजलेला...*



*कल्पकता आज येथे राष्ट्र हिता कामी,*

*देशाच्या विकासात लेक ही अग्रक्रमी,*



*🖋️प्रकाशसिंग राजपूत🖋️*

          औरंगाबाद


मुंबई - नागपूर होत असलेल्या समृद्धी महामार्ग वरील माझे गीत पहा....


अरे देवा..... देवास साकडे घालणारे हे गीत ....






स्पर्श सुखाचा... नविन कविता.... कवी प्रकाशसिंग राजपूत #poem, marathi,

*💁🏻‍♂️स्पर्श सुखाचा .....*



दुःखातून निघता स्पर्श होत आनंदास,

चाहूल ही सुखाची स्वागता नवचैतन्यास,



ओढ बावरण्याची हृदयी खिळून कळी ,

दुरावते चिंता भरते आशेची नव्याने तळी,



सागरी चाले थैमान भरती ओहोटीचे,

मनी ही होत संघर्ष चिंता विचारांचे,



जीवनी आता स्पर्श जिंकण्यास,

जिद्द घेत ही भरारी गवसण्यास,



विराम नको यास आता चालणे लगातार,

 नवा गंध लाभून होत मनी चमत्कार   ....


 

समृद्धी महामार्ग गीत पहा......




    *प्रकाशसिंग राजपूत*

         औरंगाबाद 

9960878457



गीत अलंकार चॕनल सबस्क्राईब करा...

माझे काव्यरंग पुस्तक Flipkart /Amazon  वर उपलब्ध ....नक्कीच खरेदी करा

Buy now


गीत अलंकारवर माझ्या रचना ऐकण्यास उपलब्ध चॕनलला सबस्क्राईब अवश्य करा...


युटूब चॕनल पहा.....


अशाच नवनविन काव्य रचना आपणांस उपलब्ध राहण्यासाठी लवकरच गीत अलंकार वर भेट देत राहा....