Home

https://geetalankar.blogspot.com/?m=1
marathi poem लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
marathi poem लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

खंत काळाची.... #poem

😢😢  *खंत काळाची* 😢😢


सुटला पदर मित्रांनो या जीवनाचा,
उरला नाही अर्थ या क्षणाचा,
सुटली साथ कहर या दाहाचा,,
करावं कायच सुटला हात मैत्रीचा,


आनंदाची गात होता गाणी,
नाही राहत होती गऱ्हाणी,
हर्ष येत व्यक्त होई मनी भाव,
खरेपणावर मृत्यूचा पडला घाव,


विसरणे हे दुःख जगी अशक्य आता,
कायच खेळ देवा मांडला होता,
परीक्षा ही अशी कशी या जीवनाची,
अश्रू दाटत वेळ आली त्रासाची,


अंधार या दिवशी कसाच पसरला,
होईल हा अनर्थ कधीही न जाणला,
ध्येर्य अनेकांचे आज पहा तुटले,
काळजात दुःख मोठे पसरले ,


तोडला तार या आयुष्याचा,
विसर न होणार या प्रसंगाचा,
हारले सारेच खंत या काळाची,
शक्ती लाभो या दुःखाला झेलण्याची...


              प्रकाशसिंग राजपूत 

भिरभिरती.... #New poem

रोज नवा नवा दिवस व त्यासोबत पुढे सरत जाणारे हे आयुष्य मानवाला नवी जगण्याची आशा मिळत राहते . यावर लिहिलेवली माझी ही कविता....


भिरभिरती  ...


सुर्यास्त होत जीवन पुढे चालती
सरत्या वेळा मोजणी आयुष्याची ठरते गणती,
काळोख पसरता थांबते एकदाची गती,
 अशी कशी मानवाच्या जगण्याची रीत ही बनती,

उगवत्या दिवसा तुझी खुलते चाल,
सुस्त जगण्याची परत पुसत काजळी,
परत अशी जीवांची सुरु होते धाव,
चक्र तुझे असे जगण्यात सगळे गोंधळी,

वनवा पसरतोय कसाच या जगती ,
स्वार्थी रुप पहा दिसताय सभोवती,
वर्णन कसे उल्लेखावे माणसांचे,
त्याची राहते सदैव उणीव सोबती ,

कंटाळून ही धरणी ही यास सोसती,
कृतघ्नता ही ओळख माणसाची ,
येईल विश्वास कसाच या वागण्याचा,
माणसाची नीती ही भिरभिरती....

   *🪶प्रकाशसिंग राजपूत 🪶*
            औरंगाबाद 
  📲  9960878457

शेतजमीन

शेतकऱ्यांना सुखाने जगू देणारी धरणीमाता. त्यांच्या घरामध्ये भरभराट आणते ,या मातेचा आशीर्वाद मुळे संपूर्ण आयुष्य सुखाने जाते. संसारात भरभराट  होते वेगवेगळ्या पद्धतीने शेतीपासून झालेला विकास हा शेतकऱ्याच्या आयुष्याला एक नवीन आकार देतो. यावरच लिहिलेली माझी कविता आज आपणा समोर मी सादर करत आहे...

शेतजमीन....

धरणीचं रुप न्यारं ,
कष्ट करण्या सारं,
धनधान्याचा झरा,
माय तु घेत भारं,

पोट चिरुन राहतं,
तप्त ऊन सोसतं,
लाह्या या उजळत,
सज्ज वाटे तापतं,

ओसरता सारं ताप,
अधीर चिंब होण्यात,
मृग नक्षत्र  येण्यात,
आतूर पोटी घेण्यात,

वाफसा आणत सज्ज,
बीज पोसण्या मायेने ,
मातृत्वाची ही प्रचिती,
अंकूर फुटून कृपेने,

रोप बनवत सांभाळे,
पोषण सृष्टी निर्वाहाचे,
काळजी ही जीवांची,
शेतजमिन रुप मातेचे

विसबे लेकरं सारी,
फळ गोड या कष्टाचं,
पेरले त्यास जागते,
उपकार कसं फेडायचं...

     *🪶प्रकाशसिंग राजपूत🪶*
          औरंगाबाद
9960878457