Home

https://geetalankar.blogspot.com/?m=1
good thoughts लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
good thoughts लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

फारच सुंदर विचार... Good thoughts,

 हे कोणी लिहिलं माहिती नाही. पण जे काही लिहिलं त्यास मानाचा मुजरा....




🙏🏼शुभ सकाळ मित्रमैत्रिणींनो,


आयुष्य...एक सुंदर तारांगण.✨💫🌟


माणसाचे कपडे फाटले तर,

ते शिवता येतात.

पण विचारच फाटके असतील,

तर आयुष्याच्या चिंध्या होतात.

काय बोलावे हे ज्ञान ठरवते,

कसे बोलावे हे कौशल्य ठरवते,

किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते, 

पण एखादी गोष्ट बोलावी की नाही,

हे आपला संयम आणि

संस्कारावर अवलंबून असते.

चुकीला चूक,

आणि बरोबर ला बरोबर,

म्हणायला शिकलं पाहिजे.

नुसतं स्वार्थासाठी जगणं,

सोडून दिलं पाहिजे.

जिथे चूक नाही तिथे झुकु नका.

आणि जिथे सन्मान नाही,

तिथे थांबू नका.

उशिरा मिळालेले सत्य हे,

कुलूप तोडल्यानंतर,

चावी मिळाल्यासारखे असते.

यशस्वी होण्यासाठी,

चुकणं आणि शिकणं,

दोन्ही महत्वाचं असतं.

कुठे व्यक्त व्हायचं* 

आणि कधी समजून घ्यायचं

हे कळलं तर,

आयुष्य भावगीत आहे.!

किती ताणायचं

आणि कधी नमतं घ्यायचं,

हे उमजलं तर,

आयुष्य 'निसर्ग' आहे. !

किती आठवायचं

*आणि काय विसरायचं,* 

*हे जाणलं तर,* 

*आयुष्य 'इंद्रधनुष्य' आहे. !* 

*किती रुसायचं* 

*आणि केव्हा हसायचं,* 

*ओळखलं तर,* 

*आयुष्य 'तारांगण' आहे.!* 

*कसं सतर्क रहायचं* 

*आणि कुठे समर्पित व्हायचं* 

*हे जाणवलं तर,* 

*आयुष्य नंदनवन' आहे..!* 

*कुठे,? कधी,? किती,? काय,? केव्हा,? कसं,?* 

*याचा समतोल साधता आला तर,* 

*आयुष्य खूप सुंदर आहे...* 

*काही माणसं लाखात एक* *असतात* 

*आणि काहींकडे लाख* *असले,* 

*तरी ते माणसात नसतात.* 

*दु:खांच्या दिवसांमध्ये,* 

*आनंदाची आशा ठेवणारी माणसं,* 

*कुठल्याही प्रसंगी,* 

*ठामपणे उभी राहतात.* 

*ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता,* 

*याचे 'भान',* 

*आणि भान म्हणजे कधी काय करू नये,* 

*याचं 'ज्ञान',* 

*दुःख गिळून आनंद व्यक्त करणे,* 

*म्हणजे जीवन...* 

*कष्ट करून फळ मिळवणे,* 

*म्हणजे व्यवहार...* 

*स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे,* 

*म्हणजे सहानुभूती...* 

*आणि माणूसकी शिकून,* 

*माणसासारखे वागणे,* 

*म्हणजे अनुभूती...* 

*प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते.* 

*ती काहींच्या डोळ्यातून,* 

*काहींच्या मनातून,* 

*काहींच्या अंतर्मनातून तर,* 

*काहींच्या स्मित हास्यातून व्यक्त होते.* 

*सुख‌ म्हणजे नक्की काय,?* 

*ह्याचं उत्तम उदाहरण,* 

*भरलेलं घर,* 

*आणि एकमेकांची साथ...!🤝*