Home

https://geetalankar.blogspot.com/?m=1
हिरवा निसर्ग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हिरवा निसर्ग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

साजे हिरवा निसर्ग .... #nature #poem

पावसाळा सुरु झाला की सृष्टी नवीन तेजस्वी रुपात आपणांस दिसू लागते. त्यातल्या त्यात श्रावण महिना तर बात कुछ औरच बनून जाते. त्यावरच लिहिलेली माझी कविता आपणांस खास करून पाठवीत आहे. ब्लाॕगवर याचे गायन असलेला व्हिडीओ ही देण्यात आलेला आहे.


🌧️ *साजे हिरवा  निसर्ग* 🌨️.....


साजे हिरवा निसर्ग बहरून,
जीवन आणतं पुन्हा गहीवरून...

मेघ बरसूनी खुलवे ह्या सृष्टीस,
वाटू लागे हिरवे अंगण या दृष्टीस...
(साजे हिरवा निसर्ग बहरून,
जीवन आणतं पुन्हा गहीवरून.)

चींब चींब होऊन धरणी.. वाहे पाझर,
धारा धो -धो होण्यास आतूर,
(साजे हिरवा निसर्ग बहरून,
जीवन आणतं पुन्हा गहीवरून.)

ओसंडून वाहता खडकावर जलधारा,
मधूर संगीत दिव्यत्वाचा वाही वारा... 
(साजे हिरवा निसर्ग बहरून,
जीवन आणतं पुन्हा गहीवरून.)

डोंगर दरीतून धावत ही सरीता,
तरंग  नवे दाखवी वाहता वाहता...
(साजे हिरवा निसर्ग बहरून,
जीवन आणतं पुन्हा गहीवरून.)

    🪶 *प्रकाशसिंग राजपूत*🪶
           औरंगाबाद