Home

https://geetalankar.blogspot.com/?m=1
हताश... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हताश... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

हताश...

वेळ माणसाची खूप मोठी परीक्षा घेत असतो. आपण किती ही यश मिळविण्यासाठी धडपडत असलो तरी शेवटी वेळ आपणांस हताश करुन सोडतो. अशा परिस्थितीत मनुष्य एकदा तरी गेलेला असतो.यावरच लिहिलेली ही कविता  नक्कीच  वाचा आम्हाला follow करा......

हताश....

खेळ हा कसाच चालला,
परिस्थितीशी होत हताश,
करण्यास नाही मिळे साथ,
दैवत हे कर्म ही होत निराश ,

वैरी हा काळ दाखवे रुप,
अपयशाचा गुंता हा बनत,
होत विसर या जगण्याचा,
हतबळ करुन मागे आणत,

नमलो अखेर या काळास ,
स्थिरावण्या हवा विराम,
तंग झालो अशा विचाराने ,
सुटण्या हे कोडे मिळो आराम,

कल्पित होते विश्व असे काही,
फौल ठरले सारे येता अनुभव,
काळ शिकवित सत्याचा पाठ,
जगण्यास नव्याने हवे वैभव,

     🪶प्रकाशसिंग राजपूत🪶
          औरंगाबाद 
📲  9960878457