Home

https://geetalankar.blogspot.com/?m=1
समृद्धी महामार्ग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
समृद्धी महामार्ग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

समृद्धी समृद्धी

औरंगाबाद ते नागपूर होत असलेला मोठा समृद्धी महामार्ग

 नक्कीच महाराष्ट्राला खूप मोठी भरभराट आणून देणार आहे . ज्यामुळे महाराष्ट्राच्या  विकासाला फार मोठी गती प्राप्त होणार आहे  दूरचे अंतर हे काही तासांमध्ये पार होणार आहे .त्यामुळे गतिमान राज्याच्या विकासाला नवी गती प्राप्त होणार आहे.
        यावर लिहिलेली माझी कविता...
समृद्धी ..... समृद्धी ......

आता सारीच  होणार भरभराट ,
आली ओ समृद्धी .... पहा समृद्धी वाट....
महाराष्ट्रात  घडतेय आता नवी पहाट,
दरी खोऱ्यातून जात आहे ही वाट,

जीवन बदलेल आता होईल प्रवास सुखर,
जोडीत शहरे ही आता तोडीत अंतर,
वेग प्रगतीचा आता हो गाठेल निरंतर ,
सुलभ होईल भ्रमण मिळाला मार्ग सुंदर,

ऊर्जा मिळतय नवी  राज्यास प्रखर,
रचला जातोय इतिहास नव्याने ' अखेर ,
कोरुन शिला आखतेय भाग्यरेखा बेसुमार,
क्रांती अशी या युगात होतेय साकार....

आता होणार होणार भरभराट ,
आली ओ आली समृद्धी .... समृद्धी वाट....

    ✒️ प्रकाशसिंग राजपूत✒️
           औरंगाबाद