नविन काव्यरचना
सारेच रमाईचे उपकार..
*भिमाचं साम्राज्य घडलं हे सविधान,*
*रमाईची साथ लाभली त्यांस वरदान,*
*गातोय कीर्ती आज बाळ ते थोर,*
*नाही जोडी लाभली या भुमीला आजवर,*
*(भिमाचं साम्राज्य घडलं हे सविधान...)*
*माझ्या देशाचा समाज झाला आज बलवान,*
*रमाईची पुण्याई ठरली महान,*
*(भिमाचं साम्राज्य घडलं हे सविधान...)*
*इतिहास असा जो रचला साधा न सुधा,*
*मानव जातीचा सुटला तिडा जो उचलून विडा ,*
*(भिमाचं साम्राज्य घडलं हे सविधान...)*
*आजवर ठरली भुमी ही थोर,*
*सावित्री नं रमाई लढली जोवर*
*(भिमाचं साम्राज्य घडलं हे सविधान...)*
*सारेच रमाईचे उपकार..*
*लोकशाही ही झाली साकार...*
*(भिमाचं साम्राज्य घडलं हे सविधान...)*
✒️ *प्रकाशराज*✒️
(प्रकाशसिंग राजपूत)
छ.संभाजीनगर
*माता रमाई यांच्या पुण्यतिथी निमित्त काव्यमय अभिवादन💐🙏🏼*
व्हिडीओ स्वरूपात पहा....