Home

https://geetalankar.blogspot.com/?m=1
शेतकरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शेतकरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शेतजमीन

शेतकऱ्यांना सुखाने जगू देणारी धरणीमाता. त्यांच्या घरामध्ये भरभराट आणते ,या मातेचा आशीर्वाद मुळे संपूर्ण आयुष्य सुखाने जाते. संसारात भरभराट  होते वेगवेगळ्या पद्धतीने शेतीपासून झालेला विकास हा शेतकऱ्याच्या आयुष्याला एक नवीन आकार देतो. यावरच लिहिलेली माझी कविता आज आपणा समोर मी सादर करत आहे...

शेतजमीन....

धरणीचं रुप न्यारं ,
कष्ट करण्या सारं,
धनधान्याचा झरा,
माय तु घेत भारं,

पोट चिरुन राहतं,
तप्त ऊन सोसतं,
लाह्या या उजळत,
सज्ज वाटे तापतं,

ओसरता सारं ताप,
अधीर चिंब होण्यात,
मृग नक्षत्र  येण्यात,
आतूर पोटी घेण्यात,

वाफसा आणत सज्ज,
बीज पोसण्या मायेने ,
मातृत्वाची ही प्रचिती,
अंकूर फुटून कृपेने,

रोप बनवत सांभाळे,
पोषण सृष्टी निर्वाहाचे,
काळजी ही जीवांची,
शेतजमिन रुप मातेचे

विसबे लेकरं सारी,
फळ गोड या कष्टाचं,
पेरले त्यास जागते,
उपकार कसं फेडायचं...

     *🪶प्रकाशसिंग राजपूत🪶*
          औरंगाबाद
9960878457