Home

https://geetalankar.blogspot.com/?m=1
शिक्षणमंत्री लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिक्षणमंत्री लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शिक्षणमंत्री शिक्षकांना काय म्हणाले..

 शिक्षकांनी लाख लाख रुपये पगार घ्यायचा आणि मुलांनी मोडक्या शाळेत बसायचे का? शिक्षण मंत्री 'दत्तक शाळा योजना' रद्द करावी, राज्‍य कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, यासह अनेक विविध मागण्यांसाठी शिक्षण-नोकरी बचाव समितीच्या पुढाकारातून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावरच आपली प्रतिक्रिया देताना शिक्षणमंत्री  म्हणाले ...👇

शाळेच्या विकासासाठी निधी देण्यात येतो. सगळ्यात जास्त निर्णय घेणारा मी मंत्री आहे. शिक्षक गावी राहत नसतांना सुद्धा भत्ते घेतात, याकडे मी जाणून बुजून दुर्लक्ष केलंय. शिक्षकांबाबत सर्व चांगले निर्णय घेऊन आमची बदनामी केली जातेय.

शाळा मजबुतीकरणाच्या निर्णयामध्ये एकही शाळा बंद होत नाही. एकही शाळा बंद केली जाणार नाही आणि एकाही शिक्षकाला कमी केले जाणार नाही, हा निर्णय जाहीर केलाय. कुठल्या अधिकारात मोर्चे निघत आहेत, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय.

अत्यंत चुकीची प्रथा महाराष्ट्रात पडायला सुरुवात झालीय. शिक्षकांनी जीआर वाचायला पाहिजे. शिक्षकांनी लाख लाख रुपये पगार घ्यायचा आणि मुलांनी मोडक्या शाळेत बसायचे का? केसरकरांनी मिडिया समोर आपले मत व्यक्त केले.