Home

https://geetalankar.blogspot.com/?m=1
मोर नाचे.... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मोर नाचे.... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

🦚🌈 *मोर नाचे*🦚🌈.....

मोराचे पीसारा फुलवून होत असलेले मयुरनेत्य पाहून मनाला एक सुखद अनुभुती मिळते. खीन्न पडलेल्या भावनांना नवा उजाळा मिळून मन हे नव्याने जगण्यासाठी समृद्ध बनते.सुंदरतेने सजलेला हा साज जीवनाला फार मोठा उपदेश देऊन जातो. यावर लिहिलेली माझी ही कविता खास आपणासाठी सादर करीत आहे. आवडल्यास काॕमेंट अवश्य करा.


🦚🌈 *मोर नाचे*🦚🌈.....


खुलता रुप या सृष्टीचे,
मोर नाचे फुलवून पीसारा,
सौंदर्य असे स्वर्ग येत भुईवर,
नयन मोहित पाहूनी नजारा,

ओढ लावूनी साद घालते,
संदेश नृत्यातून जीवनास,
दुःख विसरून चढे साज,
सामर्थ्य मिळे जगण्या उदयास,

खिन्न पडलेल्या भावनेस,
 होत मनी नवा हा श्रृंगार,
लाभे जीवनी ही अशी आस,
मिटते चिंता चिरुन गडद अंधार,

लागले मन हे त्याच्या नादी,
क्रीडा ही कशी जीवनी वेळेची
इंद्रधनुची प्रकाशास गवसणी,
मोर नाचे बेभान शृंखला तुटे नैराश्याची...

 *🪶प्रकाशसिंग राजपूत🪶*
          औरंगाबाद 
       9960878457