Home

https://geetalankar.blogspot.com/?m=1
मळा प्रेमाचा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मळा प्रेमाचा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मळा प्रेमाचा...

💗 मळा  प्रेमाचा....💞

खुलवा जगी आस जगण्याची,
मळा प्रेमाचा फुलवेल वेल मनाची,
वेचा फुले  सुगंधी यातून सुखाची ,
मधूर होईल जीवनी जाळी स्नेहाची,

भावनांना येईल पूर आठवणींचाही,
प्रीत जडता रंग नवा आयुष्यासही,
भरती ओहोटी येता सागराची  ,
चंद्राची कोर ही प्रेमासं सुखाची...

हिरव्या गवताची शाल धरणीची,
प्रेमास माळ ही सुखाच्या क्षणाची,
नदीच्या पात्रास तृप्त करे चाल पाण्याची ,
होण्या मधूर रात ही चांदण्याची,

ओढ ही सुखावण्या आतुरता मनाची,
प्रेमाने गात ही गाणी संगतीची,
वेळ ही कल्पना साकार होण्याची ,
तळपत्या मनास साथ निभावण्याची,

मळा हा खुलवे आण जीवनाची,
साथ या देहास मन आसण्याची,
प्रेमाची कहाणी बने  उत्कर्षाची,
राहून संगे सजेल बाग प्रेमाची....

    🪶प्रकाशसिंग राजपूत 🪶
            औरंगाबाद

प्रेमास झळ रे.....

प्रेम मनाला वेडे करणारे ,

भुरळ घालणारे काहीसे कैद करणारे तर कधी त्रास देणारे एक अदभुत विलक्षण बाब होय. मानव याच प्रेमाच्या वाटा चालीत अवघे आयुष्य येथे जगतो. यावरच लिहिलेली प्रेमाचे भाव व्यक्त करणारी माझी कविता आपणांस सादर करत आहे.....



*प्रेमास झळ रे*

मन हे कैद कुणाच्या आठवणीत,
पोहचे झळ रे प्रेमास क्षणार्धात ,

विरह या मुक्त मनाला हा असह्य ,
जीवनी उठती लाटा वर्णाचे  रे वलय,

सोसत दुरावा कशा सोसाव्या या झळा,
ओढताण ही करी मनास हा लळा,

बनवे अधीर रे राहून मनी तुझी प्रीत ,
कशीच ही राहे या प्रेमाची ही रीत,

गीत रे गुणगुणते प्रेमछट्टा मनी शिंपडण्याचे ,
शोध या क्षणाला वेलीस जसे आधाराचे,

ओतून जीवास जीव बहार येईल नवानवा ,
सखे रे साजने साकार रंग हवाहवा....

   ✒️ प्रकाशसिंग राजपूत ✒️
            औरंगाबाद 
      📲  9960878457