Home

https://geetalankar.blogspot.com/?m=1
मराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

नवीन काव्यरचना "माय मराठी"

 माय मराठी


माझ्या मराठीची गोडी

आहे अवीट अवीट

मुकुंदराज योगाने

पाया रचिलारे नीट


माझ्या मराठीचा रंग

असे गहिरा गहिरा

ज्ञानेशाच्या ज्ञानाईत

वाहे अमृताचा झरा



माझ्या मराठीचे बोल

किती वर्णू किती गावे

समर्थांच्या बोधातून

ज्ञान सकल हे घ्यावे



माय बोलीचे अभंग

ऐकताच होता दंग

एका तुका नेरे यात

उभा केला पांडुरंग



मराठीच्या या बहिणी

अहिराणी नि कोकणी

जीवनाचा सारिपाट

उलगडते बहिणी



युगे युगे येती जाती

मराठीचा जगी ठसा

पुढे पिढीला हो देऊ

अनमोल हा वारसा



               करुणा कुलकर्णी बागले

                        सेलू

धरणीच्या सपुता...

करोना सारखा आजार संपूर्ण जगाला व मानव जातीला काय संदेश देऊ पहात आहे. का? ही निसर्गाची होत असलेल्या हानीचा विपरीत परिणाम मानवाला सोसावा लागत तर नाही ना?

        निसर्ग रक्षण करण्याची जबाबदारी मानवाला आता स्विकारावी लागणार. तेव्हाच येणाऱ्या पिढीला सुखाने जगण्याची मुभा मिळेल. भविष्य सुखर होण्यास आधी वर्तमान बदलावा लागणार आहे. 




🌎 धरणीच्या सपुता...*🧍



धरणीच्या सपुता हाक तुला निसर्गाची, 
साथ राह उभा , होणार नाही विनाश तुझा,

 सुधार वागणूक स्वार्थी , खुलेल परत धरती,
 हाहांकार माजविला पाप असे घडता,

ओढावले संकट तुझ्या हाती, मिटवीत भाग्यरेखा,
सुधारणा हवी तुला , तर बदल मनरे आता,

भुतळी सर्व जीवास दे,तुझा खरा साथ आता
भविष्याची राहू दे चिंता, थांबेल जळने चिता,

     ✒️प्रकाशसिंग राजपूत ✒️
            औरंगाबाद 
   📲  9960878457