Home

https://geetalankar.blogspot.com/?m=1
प्रेमास झळ रे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेमास झळ रे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

प्रेमास झळ रे.....

प्रेम मनाला वेडे करणारे ,

भुरळ घालणारे काहीसे कैद करणारे तर कधी त्रास देणारे एक अदभुत विलक्षण बाब होय. मानव याच प्रेमाच्या वाटा चालीत अवघे आयुष्य येथे जगतो. यावरच लिहिलेली प्रेमाचे भाव व्यक्त करणारी माझी कविता आपणांस सादर करत आहे.....*प्रेमास झळ रे*

मन हे कैद कुणाच्या आठवणीत,
पोहचे झळ रे प्रेमास क्षणार्धात ,

विरह या मुक्त मनाला हा असह्य ,
जीवनी उठती लाटा वर्णाचे  रे वलय,

सोसत दुरावा कशा सोसाव्या या झळा,
ओढताण ही करी मनास हा लळा,

बनवे अधीर रे राहून मनी तुझी प्रीत ,
कशीच ही राहे या प्रेमाची ही रीत,

गीत रे गुणगुणते प्रेमछट्टा मनी शिंपडण्याचे ,
शोध या क्षणाला वेलीस जसे आधाराचे,

ओतून जीवास जीव बहार येईल नवानवा ,
सखे रे साजने साकार रंग हवाहवा....

   ✒️ प्रकाशसिंग राजपूत ✒️
            औरंगाबाद 
      📲  9960878457