प्रीत प्रेम हा मानवाच्या जीवनातला सुंगधच म्हणावा लागेल. या सुंगधी क्षणाला आपण फार रमून स्वतः ला ही विसरून जातो. काही अशाच भावनेतून लिहिलेली माझी ही कविता आपणांस आवडल्यास नक्कीच काॕमेंट करा....अशाच नव नवीन कविता व गीत करीता या ब्लाॕगला आपण नक्कीच follow करा...
💗 *प्रीत अंगण...*💖
सुर माझ्या मनाचे उमटते,
जीवनी तुझी प्रीत मज लावत,
चंदनाचा गंध जसा घर्षणातून,
मनास ही सुगंध तुझ्या संगतीत,
कोमल स्पर्श या प्रेमासंगे लागे,
हर्ष कसा हा नवा मला लाभे,
प्रीत तु जी जोडली एकदाच,
मी माझ्यात ही नाही शोभे,
धागे जुडले कसे हे या मनाशी,
माझ्या श्वासाला ही रोखते,
ओळख ही या जन्मी तुझीच,
धीर माझा आज हिरावते,
हरपून जावे या जगी वाटते,
तुझ्या प्रीत अंगणात सदा रहावे,
बंधन कसलेच या प्रेमाला समाजाचे,
मन माझे नी तुझे कुणास रुतावे....
*🪶प्रकाशसिंग राजपूत🪶*
औरंगाबाद
📲 9960878457