👼🏻बाळ नी आजोबा....🤵🏻♂
जीव गुंतुन किती आजोबात
बाळ जरी जीव किती लावतो,
घट्ट बंधन आजोबा नातवाचे,
समीप येता फुटून बांध आसवांचे,
अंतर होता बाळ पाहे आशेने,
स्वर येतात का कुण्या दिशेने,
आजोबाचे लाड गेले कसे रुसून,
रोज होता चिंतेत मन दाटून,
लेकरू किती जरी हा लहान,
डोळयांची कडा ओली होऊन,
जीव लावत आजोबा त्यास,
हवा हवा त्याला त्यांचा सहवास,
गोंडस बाळ जरी दिसे शहाणा,
आजोबांचा तो आहे कान्हा,
सखा या काळाचा तोच आधार,
सोबत अशी ही विश्व की संसार.....
✒️ *प्रकाशसिंग राजपूत*✒️
छ. संभाजीनगर