Home

https://geetalankar.blogspot.com/?m=1
खामगीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
खामगीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

खामनदी गीत

खाम  मी वसते या खडकी तिरीस....

वसविला इतिहास या औरंगाबाद  नगरीचा,
प्रवाह झाला आज जरी दूषित धारेचा,
ओसरत्या काळात रुप जरी बनले कुरूप,
वाहते तिच आस घेऊन नवा हुरूप,
खाम मी वसते या खडकी तिरीस....

साज नवा घडण्यास परत आतूर,
जल निर्मळ होवो जीव आता अधीर,
माणसा सोड रे तुझी घाणेरडी प्रथा,
राख माझी दशा सजेल नगरीची नवी गाथा,
खाम  मी वसते या खडकी तिरीस....

बादशहा ही अखेर रमून या नगरीत,
तख्त सोडून दिल्लीचे शहर वसवित,
परंपरा होती जुनी राहून छाप ,
गोदावरीस मिलाप आज वाटे शाप,
खाम मी वसते या खडकी तिरीस....

झाला खेळ खूप जाग नागरिका,
जल होऊन स्वच्छ प्रवाह बनेल का?
माझे हरपले ते वैभव मिळेल का?
नदीमाय माझी ओळख होईल का?
खाम मी वसते या खडकी तिरीस....

      ✒️प्रकाशसिंग राजपूत ✒️