Home

https://geetalankar.blogspot.com/?m=1

शिक्षकांचे समायोजन करणेबाबत

 राज्यातील उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील सन २००३-०४ ते सन २०१८-१९ या कालावधीत वाढीव पदावर कार्यरत असलेल्या पात्र शिक्षकांचे समायोजन करणेबाबत.

छ. संभाजीनगर मधील एक सुंदर मुरूमखेडावाडी शाळा 


प्रस्तावना :- राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित उच्च माध्यमिक/ कनिष्ठ महाविद्यालयातील शाळांमधील सन २००३-०४ ते २०१०-११ मधील ९३५ वाढीव पदांना संदर्भाधीन क्र. १ व २ च्या शासन निर्णयान्वये व संदर्भाधीन क्र. ३ च्या शासन शुध्दीपत्रकान्वये मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्र. ४ च्या शासन निर्णयान्वये ४२८ पदे व्यपगत करण्यात आली. सदर ४२८ पदांपैकी शिक्षण उपसंचालक यांनी वैयक्तीक मान्यता दिलेली ६८ पदे वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्र. ६ च्या शासन निर्णयान्वये पुनर्जिवित करण्यात आली आहेत.

राज्यातील उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील सन २००३-०४ ते सन २०१८-१९ मधील एकूण १२९३ शिक्षकांच्या वाढीव पदांना मंजूरी देण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी संदर्भाधीन क्र.७ च्या पत्रान्वये शासनाकडे मंजूरीसाठी सादर करण्यात आला होता. सदर १२९३ पदांपैकी यापूर्वीच्या वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये व्यपगत करण्यात आलेल्या ४२८ पदांपैकी एकूण २११ पदे पुनर्जिवित करण्यास संदर्भाधीन क्र. ८ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर उर्वरित वाढीव पदांना मान्यता देण्याच्या विषयाच्या अनुषंगाने राज्यातील वाढीव पदांवर विहीत कार्यपध्दतीने नियुक्त आणि कार्यभार उपलब्ध असलेल्या शिक्षकांचे त्याच किंवा अन्य संस्थेमध्ये समायोजन करणेसंदर्भात संदर्भाधीन क्र.०९ अन्वये संचालक कार्यालयाकडून पडताळणी केलेल्या एकूण २१२ शिक्षकांचे समायोजन करण्यासंदर्भात माहिती प्राप्त झाली. संदर्भाधीन क्र. ७ व ९ च्या पत्रान्वये शासनास प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्यातील उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील सन २००३-०४ ते सन २०१८-१९ या कालावधीतील वाढीव पदांवरील कार्यरत असलेल्या एकूण २८३ (२११+७२) पात्र शिक्षकांचे समायोजन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

राज्यातील उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयातील सन २००३-०४ ते सन २०१८-१९ या कालावधीतील वाढीव पदांवरील कार्यरत असलेल्या परिशिष्ट 'अ' व परिशिष्ट 'ब' मध्ये समाविष्ट एकूण २८३ पात्र शिक्षकांचे समायोजन करण्यास खालील अटीच्या अधिन मान्यता देण्यात येत आहे.

i) समायोजनाचे प्रचलित धोरण / नियम व शासन निर्णयानुसार यासोबत जोडलेल्या यादीतील वाढीव पदी कार्यरत असलेल्या शिक्षकांचे समायोजन पद उपलब्धतेनुसार प्रथम त्याच संस्थेत ते शक्य नसल्यास अन्य संस्थेत तथापि, त्याच विभागात संबंधित विभागीय उपसंचालक यांनी करावे. हे ही शक्य नसल्यास, अन्य संस्थेत विभागाबाहेर समायोजन करण्याची कार्यवाही संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी करावी.

ii) सदरचे समायोजन करताना मागासवर्गीय आरक्षण धोरण व बिंदूनामावलीनुसार करण्यात यावे. iii) सदरहू शिक्षक यापूर्वी वाढीव पदी कार्यरत असल्याने, त्यांना शिक्षण सेवक योजनेतून सूट देण्यात यावी व समायोजनानंतर त्यांची वेतन निश्चिती नियमित वेतनश्रेणीत त्यांची नियुक्ती दिनांकापासूनची सेवा गृहीत धरुन करण्यात यावी. तथापि, सदरहू शिक्षकांना त्यांनी यापूर्वी वाढीव पदावर केलेल्या सेवेस वेतन थकबाकी अथवा सेवानिवृत्ती वेतन व इतर कोणतेही लाभ अनुज्ञेय असणार नाहीत.

iv) सदरहू शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेल्या, अल्पसंख्यांक उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदावर कार्यरत असलेल्या शिक्षकांना पवित्र प्रणालीचे निकष लागू असणार नाहीत. तथापि, इतर शिक्षकांना पवित्र प्रणालीचे निकष लागू राहतील.

२. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत असून महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयाचा संकेतांक २०२३११०९१९०१०३२३२१ असा आहे.

का ? पेटताय इलेक्ट्रिक वाहने | ebike burning |

 का ? पेटताय इलेक्ट्रिक  वाहने ....


( लेखन - प्रकाशसिंग राजपूत औरंगाबाद
डिजिटल समूहनिर्माता व हाईब्रिड बाईक निर्माता)पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. त्यातच अधूनमधून देशांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांकडे एक उत्तम पर्याय म्हणून पाहिल्या जात आहे .ज्याप्रमाणे डिझेल आणि पेट्रोलला  सीएनजी म्हणून पर्याय पाहिल्या जात आहे. त्याच प्रमाणे भारतीय टू व्हीलर च्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांकडे जनतेचा कौल वाढत आहे.     असे होतांना अधूनमधून इलेक्ट्रिक वाहनांच्या पेट घेण्याच्या बातम्या सर्वत्र  झळकत असून यामुळे मात्र या पर्यायावर पाणी  फेरल्या जात आहे.

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची ही दुसरी जनरेशन असून पहिल्या जनरेशनची साधारणपणे १५ वर्षापूर्वीची ही वाहने ही लीड अॕसिड बॕटरीवर चालणारी होती. ज्यांच्या देखभालीचा खर्च पाहता ती मनस्ताप निर्माण करणारी ठरली होती. 
त्यात व्हायचे नेमके असे की त्या बॕटरी कमी चार्जिंग लाईफ सायकलच्या होत्या  साधारणपणे ३०० -४०० वेळा त्या चार्ज होऊन खराब होत असत. व अशा बॕटरीवर चालणारे वाहनात कालांतराने माईलेज घटत घटत अखेर ही वाहने अचानक कोठे ही बंद होत.
गेल्या २-३ वर्षात दुसऱ्या जनरेशनच्या लिथियम प्रकारच्या बॕटरीचा वापर होत जास्त माईलेज देणाऱ्या व लाईफ सायकल १५०० -२००० पर्यंत म्हणजे ४-५ वर्षे सहज चालतील अशा बॕटरीचा उपयोग झाल्याने. इलेक्ट्रिक वाहनांचा वेग व देखभालीचा खर्च कमी होत अधिक उपयुक्त ठरू लागल्या आहेत. व गेल्या वर्षभरात इंधनाच्या किंमती नवा नवा उचांक गाठत असल्याने भारतीय बाजारपेठ इलेक्ट्रिक वाहनांच्या  उत्पादनात लक्षणीय वाढ होत. नामांकित व अनेक देशी कंपन्या या क्षेत्रात येऊ लागल्या व एक मोठी स्पर्धा या क्षेत्रात बनून गेली.


  लिथियम किती उपयुक्त व धोकादायक   ....


आपण मोबाईल व लॕपटाॕप मध्ये या प्रकारच्या बॕटरी अनेक वर्षापासून वापरत आलो आहे. परंतु याचा वापर हल्ली इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आत्ता काही वर्षापासून होत आला आहे. म्हणूनच गाडी पेट का घेते हे जाणून घेण्यापुर्वी लिथियम बॕटरीची संपुर्ण माहिती पाहू.

लिथियम बॕटरीचे प्रकार

१)  लिथियम आयन  NMC
२) लिथियम फेरो फाॕस्फेट  LFP
3) लिथियम टाईटानेट   LTO

याप्रकारचे सेल वापरून बॕटरी तयार केल्या जाते.

१)  लिथियम आयन  NMC
     आज अनेक कंपन्या याच सेल असलेल्या बॕटरीचा वापर करत आहेत. वजनाला हलके व आकारात लहान असल्याने बॕटरी पॕक कमी साईजचा तयार होत असल्याने यालाच प्राधान्य दिल्या जात आहे. याचे माईलेज लिड अॕसिड व LFP बॕटरी पेक्षा अधिक आहे. या सेल ची लाईफ सायकल ही 700 -1000 इतकी आहे.

2) लिथियम फेरो फाॕस्फेट  LFP:-   लिथियम फेरो फाॕस्फेट हा बॕटरी प्रकार लिथियम आयन पेक्षा फार सुरक्षित असून याचे लाईफ सायकल २००० -२५०० असून जास्त वर्ष सर्वसाधारण ५ -६ वर्ष हे आरामशीर चालतात. फक्त आकाराने ते थोडे मोठे असतात. यामूळे तयार होणार बॕटरी पॕक थोडा मोठा होतो. व लिथियम आयन पेक्षा २० % कमी माईलेज असले तरी हे आग लागण्यापासून व स्फोट होण्यापासून सुरक्षित मानला जातो. म्हणूनच जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिक वाहन घेण्यासाठी जाणार तेव्हा LFP बॕटरी पॕक आहे कि नाही ते अवश्य पहावा.

3) लिथियम टाईटानेट   LTO  -   लिथियम श्रेणीतील सर्वात महाग पण सर्वाधिक सुरक्षित सेल हा असून किंमतीला १ सेल २५०० -३००० रु च्या घरात जातो. याला जवळ जवळ ७ - ८ हजार लाईफ सायकल असून साधारणतः २५ -३० वर्ष चालतील इतकी प्रभावी बॕटरी  आहे.पण याचा बॕटरी पॕक टु व्हिलर साठी तयार करणे खूप महागडे व जागा जास्त खाणारे असल्याने अद्याप त्याचा उपयोग काही झालेला नाही.
बॕटरी बनवतांना वापरली जाणारी साधने -

साधारणतः बॕटरी दोन पद्धतीने बनवल्या जाते एक मेटल बाॕक्स तर दुसरा साॕफ्ट पॕक म्हणजे प्लॅस्टिक आवरण असलेली. आपण पाहू बॕटरीसाठी कोणते घटक लागतात.

१) BMS ( बॕटरी management system)

      लिथियम कुठल्याही प्रकारची बॕटरीसाठी हे असणे फार आवश्यक असून हे ओव्हर हिटींग सेन्सरने युक्त असते तर बॕटरी सुरक्षित चार्ज व डिस्चार्ज करण्याची संपूर्ण जबाबदारी यालाच पार पाडावी लागते. यात ब्लुटुथ कनेक्टीव्हीटी असलेले जे की सहज मोबाईलने जोडून आपण बॕटरी बाबतीत संपूर्ण माहिती पाहू शकतो.

२)  निकेल स्ट्रिप - याचा उपयोग बॕटरी सेल जोडण्यासाठी होतो. व यात ही दोन प्रकार येतात . शुद्ध प्रतीचे हे सर्वांत्तम असते. परंतु यात फक्त निकेल आवरण असलेले आत इतर धातू असलेले वापरले जातात. काही दिवसांनी गंज खाऊन ते खराब होते.  विद्युत प्रवाह वहन करतांना ते तापतात ही.

३) सेल होल्डर   - सेल होल्डर हा बॕटरी निर्मिती मधील महत्त्वाचा घटक आहे. हे प्रत्येक सेलला त्याच जागी धरून ठेवते व विशिष्ट अंतर सेल मध्ये राखून उष्णता कमी राहण्यास उपयुक्त ठरते.

४) फिलामेन्ट टेप -   ही विशिष्ट प्रकारची दोरे असलेली चिकटपट्टी असते जी खूप ताकदीने सेल होल्डर ला बळकटी देते.

५) हिट रजिस्ट्रन्स टेप - ही टेप सेलच्या +/- टर्मिनर्लस वर लावल्या जाते जेणेकरुन शाॕर्ट सर्कीटचा धोका कमी होतो.

६) इनसुलेशन रिंग व शिट - हा उष्णता सहन करणारा कागद जो बॕटरीला शाॕर्ट सर्कीट पासून वाचवतो.

७) इपाॕक्सि शिट - सर्वात कठीण स्वरूपाची ही शीट बॕटरी पॕकला पाणी व इतर टोकदार वस्तू  पासून वाचवते हे सेलच्या बाहेरून आवरण म्हणून वापरल्या जाते.

अशा अनेक वस्तुंचा उपयोग बॕटरी बनविण्यासाठी होतो व यापेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे  बॕटरी इनटरनल रजिस्टंस IR

बॕटरी इंटरनल रजिस्टंस IR -  प्रत्येक बॕटरीला आतल्या आत विरोध करणारी ही बाब आहे. यावरच बॕटरीचा दर्जा ठरतो .जितका अंतर्गत प्रतिरोध कमी तितकी त्या सेलची  कार्यक्षमता अधिक असते. व बॕटरी चार्जींग व डिस्चार्ज होतांना तापत नाही.

बॕटरी का पेट घेतात  ?


आता वर आपण बॕटरी संबंधित संपूर्ण माहिती पाहिली. आता पर्यंत अनेक घटना आपण आग लागण्याच्या किंवा बॕटरीचा स्फोट होतो.  यामागे प्रमुख कारणे खालील प्रमाणे आहेत.

१) सदोष साहित्याचा वापर -  आपल्या देशात कमी किंमतीवर जास्त भर असतो तेव्हा बॕटरी बनवतांना मग तशा स्वस्तात स्वस्त साहित्य वापरण्याकडे कल असतो .जसे निकेल स्ट्रिप , बॕटरी जुन्या लॕपटाॕपचे सेल...

२) बॕटरी बनवतांना काटकसर - बॕटरी आकार लहान राहण्यासाठी व खर्च कमी येण्यासाठी सेल होल्डर वापरत नाहीत ज्याने असुरक्षितता वाढते. बॕटरी आवरण जळून निगेटिव्ह टर्मिनल जुळतात व बॕटरी सिरीज बनलेली असल्याने त्याला अर्ध्या बॕटरीचा पाॕझिटिव्ह + टर्मिनल आलेला असल्याने शाॕर्ट सर्किट होतो व बॕटरी पेट घेते.

३)  हवामान व रस्ते - सतत उष्ण वातावरण व खराब रस्ते यामुळे वाहन चालवितांना मोटर अधिक ताकद वापरते व तेव्हा बॕटरी डिस्चार्ज वाढतो जास्त अॕम्पियर एकदम कमी झाल्याने बॕटरी तापून आग लागण्याचा धोका वाढतो.

४) देखभाल व मानवी चुका -  आपण जे वाहन चालवित आहोत त्याचे तांत्रिक ज्ञान थोडेफार असावे तेव्हा आपण त्याची देखभाल व्यवस्थित करू शकतो.याचबरोबर आपण वाहनात अंवातर बदल जसे अतिरिक्त लाईट , हाॕर्न लावणे असे बदल करतो व ते तशा प्रकारे मॕकेनिक करतो यावर ही अवलंबून होऊन जाते.


मित्रांनो लेख मोठा जरी वाटला आसेल तरी आपणांस इलेक्ट्रिक वाहनांची सुरक्षितता राखण्यासाठी उपयुक्त होणार आहे. या गोष्टी सर्वांना माहित व्हायला हवेत. म्हणूनच याचा हा खटाटोप म्हणता येईल.
        काही माहिती हवी असल्यास निसंकोच व्हाटसअप मॕसेज करा.  

प्रकाशसिंग राजपूत
छ. संभाजीनगर 

      


शिक्षण ... नका करा शाळा बंद | school |

 शिक्षणाची नका कापू नाळ....    बालकांचे होईल फार हाल....


शासनाने १४००० च्यावर लहान शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेत आहे. विद्यार्थ्यांसाठी हा फारच कठीण निर्णय  राहणार आहे.

मी गेल्या १९ वर्षांपासून जिल्हा परिषद शाळेत काम करत आलोय. जेव्हा लागलो होतो तेव्हा शाळेत फक्त बंद  पडलेला टु इन वन (रेडीओ + टेपरेकॉर्डर ) होता.
         अशा शाळेत २००५ ला पहिल्यांदा २ संगणक आले व ती शाळा डिजिटल होत विद्यार्थ्यांना जगाशी जोडणी झाली .
School


पुढे थांबायच नव्हतं नविन स्वरूपाचे प्रशस्त डिजिटल क्लासरुम उभारणी करण्यात वाटचाल सुरु केली . शाळा फक्त डिजिटलच नव्हे तर ग्रीन स्कूल मिशन सुंदर शाळा अशी माझी शाळा पुर्णत:  सोलार ऊर्जेवर चालणारे जिल्ह्यातील आणखी शाळेंना मार्गदर्शक ठरले २०१२ - २०१८ या काळातच  माझ्या लहानशा शाळेने छ. संभाजीनगर जिल्ह्यातील ४८ शाळेंना डिजिटल होण्यात व यातील १७ या सोलार ऊर्जेवर होण्यास प्रेरित केले. हे सर्व होत असतांना समाज सहभाग महत्त्वाचा ठरला.
     शाळेच्या परिसरात किंवा गावात एक असा शिक्षण प्रेमी असतोच जो पुर्ण रान पेटवतो नेमके अशाच व्यक्तीला माझ्या शाळेच्या भेटीत आणावा असा आग्रह संबंधित शाळेच्या शिक्षकांना असायचा. व मनी जसे तसे प्रत्यक्षात चित्र बदलतांना पाहून निश्चितच खूपच आशादायी व फलदायी बाब होत होती. पुढे हा प्रवास राज्यभर डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र या राज्यस्तरीय तथा कर्नाटकातील मराठी भाषिक बेळगांव जिल्ह्या पर्यंत असा १८ हजार शिक्षक  व १५ हजार शाळेच्या जोडणीने बनू शकला.
    शिक्षकांना डिजिटल कन्टेट उपलब्ध झाले, शैक्षणिक पीडीएफ , व्हिडीओ तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट ते होऊ लागले. मी कल्पित केलेल्या एका विचाराची व्याप्ती इतकी व्यापक होईल ही कधी कल्पनाही केलेली  नव्हती .
      पुढे कोरोना ची चाहूल भारतात झाली मार्च २०२० चे लाॕकडाऊन पडले तेव्हा मनात वेगळी भिती निर्माण झाली या ग्रामीण भागातील शिक्षणाचे काय होणार. मे २०२० ला हेडगेवार हॉस्पिटलची संस्था सावित्रीबाई फुले महिला एकात्म मंडळ यांच्या सहयोगाने शिक्षकांना आत्मबळ मिळण्यासाठी व विद्यार्थ्यांना लाॕकडाऊन काळात शिक्षण या हेतूने राज्यस्तरीय शैक्षणिक कविता गायन स्पर्धा घेतली. यात गायन व कवितेचा आशय स्पष्ट होणारे १२० व्हिडीओ १ ली ते १० वी विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊन राज्याच्या लाखो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला.
       मी स्वतः ज्या शाळेत आज काम करत आहे. ती फारच दुर्गम डोंगर भागातील शाळा असून अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य आपण साजरा जरी केला असला तरी वाडीपर्यंत अजूनही रस्ता नाही वाडी सोडा गावात ही रस्ता होऊ शकलेला नाही. अशा दुर्लक्षित मुरूमखेडावाडी शाळा सोलारयुक्त डिजिटल होत येथील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची दारे उघडी होऊ शकली. शाळेतील आमचे आधुनिक शिक्षणात रोबोटिक्स कार, फ्लाॕईंग ड्रोन प्रात्यक्षिक, डिझाईन फाॕर चेंजचे उपक्रम ,
हे सर्व करत असतांना अल्प निधी ही समस्या जरी होती वेळ प्रंसगी तो आर्थिक भार आम्ही शिक्षकांवर येत होताच याच बरोबरीने कित्येक काम शाळा सुटल्यावर श्रमदानातून घामाने व वेळप्रसंगी रक्त ही सांडले( येथे कोणास मारहाण  नव्हे तर काम करतांना झालेली वैयक्तिक इजा)
इतके काही करत असतांना २०१८ नंतर सर्व शिक्षा अभियान थांबले व समग्र  अंतर्गत शाळेंना पटसंख्या आधारित निधी सुरु झाला. लहान शाळेंना केवळ ५००० रू इतका अल्पसा निधी मिळू लागला . व नेमका २० पटा आतील शाळा बंद करण्यास जणू हाच मुद्दा कारणीभूत ठरतोय की काय असे वाटते. सन २००० नंतर सर्व शिक्षा अभियान आले. यात लहान शाळेंना वार्षिक ७५०० रु दुरुस्ती,  ५००० रू शाळा अनुदान तर शिक्षक अनुदान स्वरूपात १००० रु असे एकूण १३५००/- सरसकट मिळत. या तुलनेत आज सन २०२३ महागाई स्वरूप पाहिल्यास केवळ ५००० रू एक संस्था वर्षभर गुणवत्ता पुर्ण कशी चालू शकेल ? हा ही प्रश्न फार महत्त्वाचा म्हणावा लागेल .
शाळा व शिक्षण  हे आपल्या देशात खर्च म्हणून पाहणे हे फारच दुर्देवी आहे. मुळात हे खर्च नसून ही उदयाची विकसित भारत निर्माण होण्यासाठीची फार मोठी गुंतवणूक असणार आहे.
    काहीही झाले तरी या ग्रामीण लेकरांचा हक्क हिरावून घेऊ नका. त्यांना त्यांच्या अंगणात मिळत असलेले शिक्षण परके करू नका. एक जरी मुलगा शिक्षणातून वंचित होऊन तो गुन्हेगार बनून समाज विध्वंसक बनला व तुरुंगात टाकून त्याला सांभाळायचा खर्च हा आज देण्यात येणाऱ्या शिक्षणापेक्षा निश्चितच जास्त असणार आहे.
   माझी सर्व राजकीय मंडळीना एक विनंती आहे. असे शिक्षण उदासीन होणारे निर्णय कृपया घेऊ नका....

आज बळ आले अखेर या शिक्षणाने देशात सर्वांना,
सोसून गुलामीचे घाव होतो अनुभवा स्वातंत्र्य सुखांना...

    प्रकाशसिंग राजपूत
        सहशिक्षक
छ. संभाजीनगर

सेवानिवृत्ती सोहळा retirement programme

 टापटीप माणसाचा टापटीप सेवापूर्ती समारंभ

 दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी करमाड केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री अशोक बनकर दादा हे नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. आजचा त्यांचा सेवापूर्ती सोहळा अविस्मरणीय अशा पद्धतीने साजरा झाला.

retirement programme 

कविता लेखन व स्वर  प्रकाशसिंग राजपूत केंद्रातील प्रत्येक शाळेने दादा बद्दल आपले मनोगत व्यक्त केले आणि भरभरून बोलले. दादा एखाद्या व्यक्ती ला एवढे प्रेम मिळणे ही खरोखरच भाग्याची गोष्ट आहे आणि आपण खरंच भाग्यवान आहात आणि आम्ही सगळे सुद्धा कारण भरभरून प्रेम करायला समोरची व्यक्तीही त्या पात्रतेची असावी लागते. 

आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती हे आपल्या कामापुरता बघत असते परंतु आज जे सर्व शिक्षक गण बोलले ते खरोखरच मनापासून होते

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपल्या केंद्रातील सर्व शिक्षकांनी खूप मेहनत घेतली आणि कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भोजन व्यवस्था उत्तम होती.


आदरणीय श्री संजय निकम सर उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन खूप खूप अभिनंदन💐💐💐