Home

https://geetalankar.blogspot.com/?m=1

बालभारती सर्वेक्षण

 महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती, पुणे 


यांच्या माध्यमातून वह्यांच्या पानांचा समावेश करून इयत्ता १ली ते ८वी साठी मराठी, इंग्लिश, हिंदी, उर्दू या माध्यमांसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तके तयार केलेली आहेत. दिनांक ८ मार्च २०२३च्या शासन निर्णयानुसार या पाठ्यपुस्तकांतील वह्यांच्या पृष्ठांबाबतची उपयोगिता व यशस्विता तपासण्यासाठी ही सर्वेक्षण लिंक तयार करण्यात आलेली आहे. या लिंकवर शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी प्रश्नावली उपलब्ध आहे. या प्रश्नावलीच्या माध्यमातून आपण आपले प्रतिसाद नोंदवावेत ही विनंती. ही लिंक ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सुरू  राहणार आहे. 

खालील लिंकवर जाऊन आपण प्रश्नावली भरु शकता...


https://ebalbharati.in/ETFeedback





शिक्षणमंत्री शिक्षकांना काय म्हणाले..

 शिक्षकांनी लाख लाख रुपये पगार घ्यायचा आणि मुलांनी मोडक्या शाळेत बसायचे का? शिक्षण मंत्री 



'दत्तक शाळा योजना' रद्द करावी, राज्‍य कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, यासह अनेक विविध मागण्यांसाठी शिक्षण-नोकरी बचाव समितीच्या पुढाकारातून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावरच आपली प्रतिक्रिया देताना शिक्षणमंत्री  म्हणाले ...👇

शाळेच्या विकासासाठी निधी देण्यात येतो. सगळ्यात जास्त निर्णय घेणारा मी मंत्री आहे. शिक्षक गावी राहत नसतांना सुद्धा भत्ते घेतात, याकडे मी जाणून बुजून दुर्लक्ष केलंय. शिक्षकांबाबत सर्व चांगले निर्णय घेऊन आमची बदनामी केली जातेय.

शाळा मजबुतीकरणाच्या निर्णयामध्ये एकही शाळा बंद होत नाही. एकही शाळा बंद केली जाणार नाही आणि एकाही शिक्षकाला कमी केले जाणार नाही, हा निर्णय जाहीर केलाय. कुठल्या अधिकारात मोर्चे निघत आहेत, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय.

अत्यंत चुकीची प्रथा महाराष्ट्रात पडायला सुरुवात झालीय. शिक्षकांनी जीआर वाचायला पाहिजे. शिक्षकांनी लाख लाख रुपये पगार घ्यायचा आणि मुलांनी मोडक्या शाळेत बसायचे का? केसरकरांनी मिडिया समोर आपले मत व्यक्त केले.

गणित मैदानावर

 🪂 *हसत खेळत शिक्षण*💁🏻‍♂️


काल शिकवतांना सुचलं व १ ली च्या ही मुलांना संकल्पना कळली 😊



*दैनंदिन अध्यापनातून बदल म्हणून आमच्या जिल्हा परिषद मुरूमखेडावाडी शाळेत आज विद्यार्थ्यांचे गणित विषयातील कोन संकल्पनेला मैदानावर कृतीयुक्त घेत विद्यार्थ्यांना समजेल व दीर्घकाळ संकल्पना स्मरणात राहणारी ही कृती .*




*सहशिक्षक*

प्रकाशसिंग राजपूत

फारच सुंदर विचार... Good thoughts,

 हे कोणी लिहिलं माहिती नाही. पण जे काही लिहिलं त्यास मानाचा मुजरा....




🙏🏼शुभ सकाळ मित्रमैत्रिणींनो,


आयुष्य...एक सुंदर तारांगण.✨💫🌟


माणसाचे कपडे फाटले तर,

ते शिवता येतात.

पण विचारच फाटके असतील,

तर आयुष्याच्या चिंध्या होतात.

काय बोलावे हे ज्ञान ठरवते,

कसे बोलावे हे कौशल्य ठरवते,

किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते, 

पण एखादी गोष्ट बोलावी की नाही,

हे आपला संयम आणि

संस्कारावर अवलंबून असते.

चुकीला चूक,

आणि बरोबर ला बरोबर,

म्हणायला शिकलं पाहिजे.

नुसतं स्वार्थासाठी जगणं,

सोडून दिलं पाहिजे.

जिथे चूक नाही तिथे झुकु नका.

आणि जिथे सन्मान नाही,

तिथे थांबू नका.

उशिरा मिळालेले सत्य हे,

कुलूप तोडल्यानंतर,

चावी मिळाल्यासारखे असते.

यशस्वी होण्यासाठी,

चुकणं आणि शिकणं,

दोन्ही महत्वाचं असतं.

कुठे व्यक्त व्हायचं* 

आणि कधी समजून घ्यायचं

हे कळलं तर,

आयुष्य भावगीत आहे.!

किती ताणायचं

आणि कधी नमतं घ्यायचं,

हे उमजलं तर,

आयुष्य 'निसर्ग' आहे. !

किती आठवायचं

*आणि काय विसरायचं,* 

*हे जाणलं तर,* 

*आयुष्य 'इंद्रधनुष्य' आहे. !* 

*किती रुसायचं* 

*आणि केव्हा हसायचं,* 

*ओळखलं तर,* 

*आयुष्य 'तारांगण' आहे.!* 

*कसं सतर्क रहायचं* 

*आणि कुठे समर्पित व्हायचं* 

*हे जाणवलं तर,* 

*आयुष्य नंदनवन' आहे..!* 

*कुठे,? कधी,? किती,? काय,? केव्हा,? कसं,?* 

*याचा समतोल साधता आला तर,* 

*आयुष्य खूप सुंदर आहे...* 

*काही माणसं लाखात एक* *असतात* 

*आणि काहींकडे लाख* *असले,* 

*तरी ते माणसात नसतात.* 

*दु:खांच्या दिवसांमध्ये,* 

*आनंदाची आशा ठेवणारी माणसं,* 

*कुठल्याही प्रसंगी,* 

*ठामपणे उभी राहतात.* 

*ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता,* 

*याचे 'भान',* 

*आणि भान म्हणजे कधी काय करू नये,* 

*याचं 'ज्ञान',* 

*दुःख गिळून आनंद व्यक्त करणे,* 

*म्हणजे जीवन...* 

*कष्ट करून फळ मिळवणे,* 

*म्हणजे व्यवहार...* 

*स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे,* 

*म्हणजे सहानुभूती...* 

*आणि माणूसकी शिकून,* 

*माणसासारखे वागणे,* 

*म्हणजे अनुभूती...* 

*प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते.* 

*ती काहींच्या डोळ्यातून,* 

*काहींच्या मनातून,* 

*काहींच्या अंतर्मनातून तर,* 

*काहींच्या स्मित हास्यातून व्यक्त होते.* 

*सुख‌ म्हणजे नक्की काय,?* 

*ह्याचं उत्तम उदाहरण,* 

*भरलेलं घर,* 

*आणि एकमेकांची साथ...!🤝*



आयुष्य हे खंबीर सदा सदा बनते

 आयुष्य हे खंबीर सदा सदा बनते...





जगण्यापरी जाते बाग आठवणीचा खुलवते,

स्नेह नात्यातला जपून जगी प्रेम सजवते,


क्षणभर विभोर होत उदास जरी बनते,

धीर असा जगण्यास नव्याने स्विकारते,


संकटातून अखेर लढणे जरी शिकते,

अखंड माळ सुख दुःखाची अंती विणते,


शुद्ध मनाच्या दर्पणातून रुप जरी खुलते,

वेदनांच्या आठवणीतून मन हे तळपते,


निशब्द जरी बिकट काळ येता दिसते,

आयुष्य हे खंबीर सदा सदा बनते...


   ✒️ *प्रकाशसिंग राजपूत *✒️

साहेब सेवानिवृत्त होताना

 साहेब....


साहेब या शब्दाचा कधी धाक नव्हता वाटायचा,
दरारा होता आपल्या कर्तुत्व घडविणाऱ्या सुचनांचा,


वेळप्रसंगी स्वर जरी आपला उंच लागायचा,
पण क्षणात काळजात हो दादा बनून साठायचा,*


कुटुंबातील जेष्ठ जणू आपण प्रत्येक प्रसंग निभावून जायचे,
तत्परतेच्या  वेगाने सर्वांनाच गतीमान करायचे ,

निष्ठा होती आपली सदैव कर्तव्य पार पाडायची,
दोषी न कुणास होऊ देता हिंमत सागर पार करायाची,

जादुई जणू प्रत्येक सुचना अपली असायची,
परीवर्तन नंतर आधी मनदर्पण अशीच दिसायची,

आयुष्यातील आमच्या कर्तुत्वाचा खरा वाटा आपला मानतो,
कारण सुचनारुपी शब्दपण मनातून यशमंत्रच वाटतो...

आज जरी सेवापुर्ती इथे आपली घडत आहे,
यशकीर्ती सुमने किती तरी गावोगावी फुलत आहे....


_करमाड केंद्राचे केंद्रप्रमुख व आमचे खरे मार्गदर्शक सेवानिवृत्त होत आहेत त्यांना एकूण सेवाकाळास मानाचा मुजरा... पुढील जीवन सुखी, समाधानी व निरामय राहो या सदिच्छा_*💐💐💐🌹🌹🌹😊🙏🏼

✒️ *प्रकाशसिंग राजपूत*✒️
      *सहशिक्षक*
जि.प.प्रा.शा. मुरूमखेडावाडी

बाळ नी आजोबा...

 👼🏻बाळ नी आजोबा....🤵🏻‍♂


जीव गुंतुन किती आजोबात

बाळ जरी जीव किती लावतो,

घट्ट बंधन आजोबा नातवाचे,

समीप येता फुटून बांध आसवांचे,



अंतर होता बाळ पाहे आशेने,

 स्वर येतात का कुण्या दिशेने,

आजोबाचे लाड गेले कसे रुसून,

रोज होता चिंतेत मन दाटून,



लेकरू किती जरी हा लहान,

डोळयांची कडा ओली होऊन,

जीव लावत आजोबा त्यास,

हवा हवा त्याला त्यांचा सहवास,



गोंडस बाळ जरी दिसे शहाणा,

आजोबांचा तो आहे कान्हा,

सखा या काळाचा तोच आधार,

सोबत अशी ही विश्व की संसार.....



✒️ *प्रकाशसिंग राजपूत*✒️

        छ. संभाजीनगर