Home

https://geetalankar.blogspot.com/?m=1

रंग उधळत... नविन काव्यरचना

 🟣🟡 रंग उधळत...🔵🔴प्रीत जणू या रंगास प्रेमाची,

उधळता हर्ष यातून नवा घडे,

अलगद देत गती जीवनास,

पाऊलोपाऊली आंनदाचे सडे,थट्टा लहान्यांची मुक्तांगणी,

पाखरांची झेप नभी भारी,

चाहुल ही सुखद क्षणांची ,

विसरून सारं दुःख हारी,बहरुन ही मनाचं सार रान,

ओढ लागली त्यासी स्नेहाची,

कडी ही जुळत खरी मैत्रीची,

दंग जरी चाले वाट जीवनाची,आरोहात आज सारा स्वर,

मुक्त पाट दबल्या दुःखाचा ,

धन्यता ही याच सणाची,

रंग उधळत खरं जगण्याचा...   ✒️ *प्रकाशसिंग राजपूत*✒️

           औरंगाबाद 

📲 9960878457