Home

https://geetalankar.blogspot.com/?m=1

स्पर्श सुखाचा... नविन कविता.... कवी प्रकाशसिंग राजपूत #poem, marathi,

*💁🏻‍♂️स्पर्श सुखाचा .....*दुःखातून निघता स्पर्श होत आनंदास,

चाहूल ही सुखाची स्वागता नवचैतन्यास,ओढ बावरण्याची हृदयी खिळून कळी ,

दुरावते चिंता भरते आशेची नव्याने तळी,सागरी चाले थैमान भरती ओहोटीचे,

मनी ही होत संघर्ष चिंता विचारांचे,जीवनी आता स्पर्श जिंकण्यास,

जिद्द घेत ही भरारी गवसण्यास,विराम नको यास आता चालणे लगातार,

 नवा गंध लाभून होत मनी चमत्कार   ....


 

समृद्धी महामार्ग गीत पहा......
    *प्रकाशसिंग राजपूत*

         औरंगाबाद 

9960878457गीत अलंकार चॕनल सबस्क्राईब करा...

माझे काव्यरंग पुस्तक Flipkart /Amazon  वर उपलब्ध ....नक्कीच खरेदी करा

Buy now


गीत अलंकारवर माझ्या रचना ऐकण्यास उपलब्ध चॕनलला सबस्क्राईब अवश्य करा...


युटूब चॕनल पहा.....


अशाच नवनविन काव्य रचना आपणांस उपलब्ध राहण्यासाठी लवकरच गीत अलंकार वर भेट देत राहा.... सचिन वालतुरेसरांची गुरुजींच्या कामावरील सुंदर कविता....

 सचिन वालतुरेसरांची गुरुजींच्या कामावरील अतिशय सुंदर कविता....


काल आमच्या शाळेत  वेगळंच प्रकरण घडलं

गुरुजींना न्यायला देवानं

यमाला अर्जंट धाडलं !


न विचारताच यम घुसला डायरेक्ट गुरुजींच्या वर्गात

चला गुरुजी आपल्याला जायचं आहे स्वर्गात


एका मिनीटात तुम्हाला येणार आहे अटॅक

तुमचा जीव माझ्या मुठीत येईल मग फटॅक


यमाचं बोलणं ऐकूण गुरुजी लागले रडू

खूप दिवसांनी घेतलाय रे यमा हाती खडू


कोरोनाने पोरांची शाळा होती बंद

आजच्या दिवस घेऊ दे त्यांना शिकण्याचा आनंद


फक्त एक कविता दाखवतो त्यांना गाऊन

मग जा खुशाल तू माझे प्राण घेऊन


ठीक आहे म्हणत यम वर्गाबाहेर बसला

गुरुजींचा डान्स पाहून तो ही फार हसला


यमालाही आठवलं त्याचं बालपण

 दाटून आला गळा त्याचा गहिवरलं मन


आजच्या दिवस एक्स्ट्राचा घ्या म्हणला जगून

उदया येतो म्हणत यम गेला आला पावल्या निघून


दुसऱ्या दिवशी सकाळीच यम झाला हजर

गुरुजींचीही पडली त्याच्यावरती नजर


काहीही म्हण यमा अर्जंट आहे काम

केंद्रावर जाऊन येतो तोवर जरा थांब


सर्वेक्षणाची फाईल साहेबांस येतो देऊन

किरकोळ रजेचा अर्जही येतो जरा ठेवून 


करायच्या आहेत अजून तांदळाच्या प्रती

पोरांची बी काढायची आहेत बँकेमधे खाती 


आकारिकचं काम पण घेतलंय काल हाती

डोक्यामध्ये नुसती गणगण काय आणि किती


शेवटचे हे आठ दिवस थांब यमा मित्रा

तोवर माझ्या मिटवतो भानगडी ह्या सतरा


शेवटची ही संधी गुरुजी आज नककी देईन

पुढच्या सोमवारी प्राण घ्यायला मी पुन्हा येईन


गुरुजींच्या डोक्याला आलं कुटुंबाचं टेन्शन

आपण गेलो तर काय होईल आपल्याला नाही पेंशन


म्हणता म्हणता उगवला शेवटचा तो सोमवार

शाळेकडे गुरुजी झाले स्कुटरवरती स्वार


तेवढ्यात गुरुजींच्या आलं काहितरी ध्यानात 

गुरुजी थेट घुसले एका कपड्याच्या दुकानात


यम म्हटला गुरुजी आज इकडं कसं काय?

तेवढ्यात गुरुजींनी धरले यमाचे ते पाय

गणवेषाचं तेवढं लावू दे आज मार्गी

आजच्या दिवस थांब उद्या जाऊ आपण स्वर्गी


काय राव गुरुजी तुम्ही रोजच आहे बिझी

तुमच्या अशा वागण्यानं डयुटी धोक्यात येईन ना माझी 


आजच्या दिवस यमा घे रे गड्या समजून

किर्द , दुरुस्ती दाखल्याचेही काम आहे पडून


उदया पासून सुरु आहे c० साहेबाचा दौरा

कामाभोवती फिरतोय बघ

गुरुजी नावाचा भोवरा


परवा पासून खेळायची आहे टॅग ची पण इनिंग

पुढच्या आठवड्यात घ्यायचं आहे गणित पेटीचं ट्रेनिंग


नंतर करायची आहे स्कॉलरशिपची तयारी

लसीकरणाची ही पार पाडायची आहे जबाबदारी


पोरांच्या परीक्षा मग तपासायचे पेपर

नवोदय मधे पोरं करायची आहेत टॉपर


कामाच्या या तानाची डोक्या  भेळ

आमच्याकडं नाही यमा  मरायलाही वेळ


खूप वाटतं फुलवावा ज्ञानाचा हा मळा

कांदा मुळा भाजी आमची खडू आणि फळा


पोरांमधे जीव ओतून करतो आम्ही काम

त्यांचा मधेच दिसतो रहिम त्यांच्या मधेच राम


फुकट पगार  म्हणणार्‍यांची वाटते भारी कीव 

हरकत नाही आज माझा घेऊन टाक जीव


यमाला आलं गलबलून , सारं काही ऐकून

तुम्हाला न्यायला गुरुजी आता येणार नाही चुकून


वाटेल तेव्हा या गुरुजी उघडेन स्वर्गाचं दार

सुंदर करा भारत आणि पोरं करा हुशार


टाटा बाय बाय करत करत  यम गेला निघून

परत येण्याआधी तो घ्या ना छान जगून


जगणं मरणं म्हणजे नाही काही वेगळं

नरक आणि स्वर्ग इथचं आहे सगळं


कामाशी काम करून घडवा नवा भारत

कामाशिवाय इथं कुणी अमर नाही ठरत


-सचिन सुधाकर वालतुरे ( नेऊरगावकर )

सेवापुस्तकात आवश्यक असणाऱ्या नोंदी भाग २ #service

 

 सेवापुस्तकात आवश्यक असणाऱ्या नोंदी भाग २ 


शासन परिपत्रक वित्त विभाग


क्र. वेपूर १२९९/प्र.क्र.५९९/सेवा-१०, दिनांक २०/०१/२००१

अन्वये खालील विवरणपत्रात दर्शविलेल्या मुद्दांचा तपशिल सेवापुस्तकास जोडून वेतनपडताळणी पथकास सादर करण्यात यावा


१. प्रथम नियुक्ती आदेश नोंद२.महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम २००६ वेतननिश्चिती संदर्भात वेतननिश्चिती पथकांनी आक्षेप नोंदविला असल्यास आक्षेप चिठ्ठीसह त्याची केलेली पूर्तता.


३. दिनांक ०१/०४/१९६६ आणि ०१/०४/१९७६ च्या वेतननिश्चितीची पडताळणी झालेली नसल्यास वित्त विभागाच्या दिनांक ११ जून, १९७९ आणि २० ऑगस्ट, १९८६ च्या आदेशान्वये सेवापुस्तकामध्ये नोंदविलेले प्रमाणपत्र आवश्यक राहील.४. वेतन पडताळणी पथकाकडून पडताळणी झाल्यानंतर पूर्वलक्षी प्रभावाने वेतनश्रेण्या सुधारीत झालेल्या असतील. तर त्या अनुषंगाने केलेल्या वेतननिश्चितीची विवरणपत्रे आणि विकल्प 

५.कर्मचाऱ्याने पदोन्नती प्रसंगी / कालबध्द पदोन्नती प्रसंगी दिलेला विकल्प (दिलेला असल्यास) 

६.एतदर्थ मंडळाची मराठी/ हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण झाल्याची/ सूट दिल्याची नोंद


७. राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बाबतीत महालेखापालाकडून/ अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई

यांचेकडून प्राप्त झालेले २५ अ / २५ ब ची विवरणपत्रे


८. कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा दिनांक अभिवृध्दी करुन वरिष्ठास मंजूर केलेला असल्यास किंवा कनिष्ठाच्या वेतन एवढे वेतन वाढवून दिलेले असल्यास त्याबाबतच्याआदेशाची प्रत

९. पदोन्नतीचा मानीव दिनांक मंजूर करुन देण्यात आलेला असल्यास असा मानीव दिनांक मंजूर करुन देण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्याच्या आदेशाची प्रत


१०. कर्मचारी गैरहजर असेल / असाधारण रजेवर असेल / निलंबित असेल तर त्यापुढील वेतनवाढी नियमित  केल्याचे आदेश.


११. सेवा प्रवेशोत्तर परीक्षा / विभागीय परीक्षा व पर्यवेक्षिय परीक्षा विहित कालावधीमध्ये उत्तीर्ण झाल्याची नोंद


१२. संगणक अर्हता परीक्षा किंवा (MSCIT) उत्तीर्ण असल्याची नोंद

१३. वेतननिश्चितीच्या नोंदी/वेतननिश्चिती विवरणपत्रे व विकल्प


१४. भोळे आयोग (०१/०४/१९७६)


१५.चौथा वेतन आयोग (०१/०१/१९८६)


१६. पाचवा वेतन आयोग (०१/०१/१९९६)


१७. सहावा वेतन आयोग


१८. सातवा वेतन आयोग


१९.पद्मनाभ आयोग


२१. आदेशाची नोंद


२२. निवडश्रेणी अकार्यात्मक वेतनश्रेणी मंजूर आदेशाची नोंद


२३. नियमित वेतनवाढी दिल्याची नोंद


२४. कालबध्द पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना लाभ मंजूरी नाँद/ वेतन निश्चिती नोंद व विवरणपत्र


२५.रजा मंजूर केल्याच्या नोंदी / संपूर्ण रजा लेख्यातील नोंदी पूर्ण करण्यात आल्या आहेत का ?भाग-२ वेतननिश्चितीचे प्रसंग-(अ)


महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१


वेतन निश्चितीचे प्रसंग


शासकीय कर्मचारी सेवेत असताना त्याची ज्या पदावर प्रथम नियुक्ती होते तेव्हापासून त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत वेळोवेळी वेतननिश्चितीचे प्रसंग येतात. थोडक्यात खालीलप्रमाणे :


१. प्रथम नियुक्ती


२. उच्च पदावर पदोन्नती


३. अधिक जबाबदारी नसलेल्या दुसऱ्या पदावर नियुक्ती


४.म.ना.सेवा (सर्वसाधारण शर्ती) नियम १९८१ मधील नियम २७ नुसार कमी वेतन असलेल्या पदावर नियुक्ती


५. निवडश्रेणीच्या पदावर नियुक्ती


६. एका संवर्गबाह्य पदावरून दुसऱ्या संवर्गबाह्य पदावर नियुक्ती


७. संवर्गबाह्य / स्वीयेत्तर सेवा/ प्रतिनियुक्तीच्या पदावरुन प्रत्यावर्तन

८. प्रशासकीय कारणास्तव उच्च पदावरुन खालच्या पदावर प्रत्यावर्तन/पदावनत


९. खंडानंतरची नियुक्ती


१०. वेतन श्रेणीत बदल झाल्यास


११. वेतनात कपात / वेतन वाढ रोखून धरणे १२. माजी सैनिकांची पुनर्नियुक्ती नंतरची वेतननिश्चिती


१३. निवृत्ती वेतनधारकांची पुनर्नियुक्ती


१४. वेतनश्रेणीत सुधारणा


१५. पदोन्नतीचा मानीव दिनांक मंजूर करुन देण्यात आलेला असल्यास


१६. सुधारित वेतन आयोग

विलक्षण मराठी भाषा......#marathi language

 विलक्षण  मराठी  भाषा.......


*रस्ता - मार्ग*

* जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता.

* जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग.


*खरं - सत्य*

*  बोलणं खरं असतं.

* सत्याला  सोबत पुरावा जोडावा लागतो.


*घसरडं - निसरडं*

* पडून झालं की घसरडं.

* सावरता येतं ते निसरडं.


*अंधार - काळोख*

* विद्युत पुरवठा खंडीत झाला की होतो तो अंधार.

* निसर्गात जाणवतो तो काळोख.


*पडणं - धडपडणं*

* पडणं हे अनिवार्य.

* धडपडणं हे कदाचित सावरणं.


*पाहणं - बघणं*

* आपण स्वत:हून पाहतो.

* दुसऱ्यानं सांगितल्यावर होतं ते बघणं.


*पळणं - धावणं*

* पाकीटमार काम झाल्यावर जे करतो ते पळणं.

* ट्रेन पकडतांना आपण जे करतो ते धावणं.


*झाडं - वृक्ष*

* जे माणसांकडून लावलं जातं ते झाडं.

* जो आधीपासूनच  असतो तो वृक्ष.


*खेळणं - बागडणं*

* जे नियमानं बांधलेलं असतं ते खेळणं.

* जे मुक्त असतं ते बागडणं.


*ढग - मेघ*

* जे वाऱ्याने ढकलले जातात ते ढग.

* जे नक्की बरसतात ते मेघ.


*रिकामा - मोकळा*

 * वेळ जो दुसऱ्याकडे असतो तो रिकामा. 

* आपल्याकडे असतो तो मोकळा वेळ.


*निवांत - शांत*

*कष्ट केल्यानंतर मिळतो तो निवांतपणा.

* काहीच न करता बसून मिळतो तो शांतपणा.


*आवाज - नाद*

* जो आपल्या चालण्यानं होतो तो आवाज.

* जो घ॔टेचा होतो तो नाद.


*झोका - हिंदोळा*

* जो आपला नंबर बागेत कधी लागेल याची वाट पाहायला लावतो तो झोका. 

* जो मुक्तपणे झाडांमधून खेळता येतो तो हिंदोळा.


*स्मितं - हसणं*

* मनात एखादी गोड आठवण आली की जे दिसतं ते स्मित.

* जे लोकां समोर दाखवावं लागतं ते हसणं.


*अतिथी - पाहुणा*

* जो यावा यावा असा वाटतो तो अतिथी.

* जो आला की कधी जाईल असं मनात येतं तो पाहुणा.


*घोटाळा - भानगड*

* जो अचानक नकळत होतो तो घोटाळा.

* जी नियोजनबद्ध पद्धतीने होते ती भानगड.


 *आभाळ- आकाश* 

भरून येत ते आभाळ.

निरभ्र असत ते आकाश.

केंद्रीय विद्यालय औरंगाबाद भरती 2021

 

 इच्छुक उमेदवार दिलेल्या पत्त्यावर मुलाखती करिता उपस्थित राहू शकतात.  केंद्रीय विद्यालय औरंगाबाद औरंगाबाद भरती 2021 बद्दल अधिक तपशील खालील प्रमाणे  आहे.

  केंद्रीय विद्यालय औरंगाबाद भरती 2021


  पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (PGT) पदासह इतर पदे भरण्यासाठी केंद्रीय विद्यालय औरंगाबादने भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. 

 इच्छुक उमेदवार दिलेल्या पत्त्यावर मुलाखत करिता उपस्थित राहू शकतात. केंद्रीय विद्यालय औरंगाबाद भरती बद्दल अधिक माहिती खालील वेबसाईटवर दिली आहे.

https://googleweblight.com/sp?u=https://aurangabadcantt.kvs.ac.in/administration/teacher-vacancy&grqid=MWpKPUMI&hl=en-IN

  इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी केंद्रीय विद्यालय   कडून भरती अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.  KVS औरंगाबाद भर्ती 2021 साठी पदव्युत्तर शिक्षक (PGT) पदांसाठी भरती आयोजित केली आहे.  वरील पदे भरण्यासाठी रिक्त पदे उपलब्ध आहेत.  या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण औरंगाबाद आहे.slot="2171345185" style="display: block; text-align: center;">पात्र उमेदवार दिलेल्या पत्त्यावर  उपस्थित राहू शकतात आणि मुलाखतीला जाण्यापूर्वी त्यांचा अर्ज सबमिट करू शकतात. मुलाखत वेळापत्रक 18 डिसेंबर 2021 आहे.


पत्ता 
केंद्रीय विद्यालय  छावणी परिसर 
औरंगाबाद

नविन काव्यरचना खिन्न प्रवास भावनांचा...

 

 *खिन्न प्रवास भावनांचा*


खिन्न प्रवास भावनांचा....


विनी वेळ दुःख जणू जीवनास,

आता होत खिन्न प्रवास भावनांचा,

सामर्थ्य  हे उरत काट तरण्यास,

जागवी ध्यास मनास या साधनांचाप्रफुल्लित होते ते ही काही क्षण 

उत्साही होते हे किती माझे मन,

नैराश्याशी होतो  जीवनी हा समर,

विचार आता तेथेच  गोते खात अन्फिरलो जरा ध्येयापासुन अलगद 

वेचत होतो विजयाची सुमने अनंत,

तोल या जगण्याचा डगमगला जरी,

तग धरण्या ध्येर्य बांधले चिरंत,हुरुप सदासर्वदा कसाच जागतो,

न मानुनी हार लढण्या जगतो,

सांभाळून बाजू असली जरी उणी,

स्वतःस लढाऊ बनवून तारतो....


       कवी

🖊️प्रकाशसिंग राजपूत🖊️

            औरंगाबाद  


माझे काव्यरंग पुस्तक Flipkart /Amazon  वर उपलब्ध ....नक्कीच खरेदी करा

Buy now


गीत अलंकारवर माझ्या रचना ऐकण्यास उपलब्ध चॕनलला सबस्क्राईब अवश्य करा...


युटूब चॕनल पहा.....अशाच नवनविन काव्य रचना आपणांस उपलब्ध राहण्यासाठी लवकरच गीत अलंकार वेबसाईट उपलब्ध करून देत आहोत.... खिन्न प्रवास भावनांचा.... #Life

 *खिन्न प्रवास भावनांचा*

विनी वेळ दुःख जणू जीवनास,

आता होत खिन्न प्रवास भावनांचा,

सामर्थ्य  हे उरत काट तरण्यास,

जागवी ध्यास मनास या साधनांचाप्रफुल्लित होते ते ही काही क्षण ,

उत्साही होते हे किती माझे मन,

नैराश्याशी होतो  जीवनी हा समर,

विचार आता तेथेच  गोते खात अन्फिरलो जरा ध्येयापासुन अलगद ,

 वेचत होतो विजयाची सुमने अनंत,

तोल या जगण्याचा डगमगला जरी,

तग धरण्या ध्येर्य बांधले चिरंत,हुरुप सदासर्वदा कसाच जागतो ,

न मानुनी हार लढण्या जगतो,

सांभाळून बाजू असली जरी उणी,

स्वतःस लढाऊ बनवून तारतो....*🖊️प्रकाशसिंग राजपूत🖊️*