Home

https://geetalankar.blogspot.com/?m=1

१ ली ते ७ वी चे वर्ग दि. १ डिसेंबर २०२१ पासून सूरु.... #School start, #covid

 आता इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग दि. ०१ डिसेंबर, २०२१ रोजी पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.


शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण: २०२१/प्र.क्र.१७८/एसडी-६
२. या विभागाच्या दिनांक ०७ जुलै २०२१ च्या परिपत्रकामध्ये ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. तर दि. १० ऑगस्ट २०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये महानगरपालिका क्षेत्राकरिता आयुक्त व नगरपालिका/नगरपंचायत/ ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.


२.१ सदर समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी खालील बाबीवर चर्चा करावी असे आदेश काढण्यात आले. (i)  शाळा सुरु करण्यापूर्वी संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.


ii) सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद / आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करुन १००% लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत. 


iii) विद्यार्थ्याच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.


(iv) कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी अथवा नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठविणे.


(v) विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करून शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थ्यांचे  विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत तसेच कोविंडग्रस्त विद्यार्थ्यांच्या शेजारील विद्यार्थ्यांची सुध्दा कोरोना चाचणी करुन घ्यावी.


२.२) शाळा सुरू करताना मुलांना टप्या-टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गाना अदला बदलीच्या दिवशी सकाळी दुपारी ठराविक महत्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य इ.यासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचना (SOP) चे पालन करावे.


२.३) संबंधीत शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी. 


२.४) वरील सर्व बाबींचे शहरी भागात महानगरपालीका आयुक्त व इतर भागात जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ मुख्याधिकारी, नगरपरिषद यांनी शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या समवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथे संबंधितांना सूचना कराव्यात.


३. शासन परिपत्रक, दिनांक ७ जुलै, २०२१, दिनांक १० ऑगस्ट २०२१ नुसार देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांसह दिनांक २४ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या परिपत्रकातील •अतिरिक्त मार्गदर्शक सूचना एकत्रित करून वरील प्रमाणे शाळा सुरु करण्यासाठी सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ व परिशिष्ट ब मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे.


४. दि. १ डिसेंबर २०२१ पासून ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते ४ थी व महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांचे शाळेतील वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांनी स्वागत करुन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा अशा सुचना देण्यात आल्या  आहे.


५. दि. १ डिसेंबर २०२१ पासून सुरु होत असलेल्या शाळांबाबत शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक तेथे मार्गदर्शन करण्याच्चे सुचविले आहे. भेटीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावयाचा आहे. विभागीय उपसंचालकांनी एकत्रित अहवाल शिक्षण संचालकांना सादर करावा लागणार आहे. वरील मार्गदर्शक सुचनांव्यतिरिक्त शासनाने कोविड १९ संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे देखील पालन करावयाचे आहे. 


शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण २०२१/प्र.क्र.१७८/एसडी-६हॕमर हेड अमर असलेल्या ह्या जीवा बद्दल तुम्हाला माहित आहे का..... #Hammerhead #अमर जीव,

 

 अमर असलेल्या  ह्या  जीवा बद्दल तुम्हाला माहित आहे का..... 


हॕमरहेड  Hammerhead worm हा एक विषारी प्राणी आहे परंतु याचा मानवाला थेट धोका नाही.


पृथ्वीवर करोडो जीव आहेत असे काही जीव आहेत त्यांना आपण कधीच पाहिलेले नसते  किंबहुना अचानक पहिल्यांदा नजरी पडल्यास आपण त्याबद्दल माहित करून घेण्यासाठी फार उत्सुक होऊन जातो. 
तर आज आपली उत्सुकता व माहिती वाढवणारी पोस्ट घेऊन आलो आहोत.
 Earthworm ची मोठ्या प्रमाणात शिकार करत असल्यामुळे  Earthworm हे वनस्पती साठी उपयुक्त आहे.


 आणि त्यांची संख्या hammerhead worm मूळ जर कमी झाली तर पर्यावरण संकटात येऊ शकते .


तसेच हा प्राणी संभाव्य अमर आहे. 


           याबद्दल व्हिडीओत अधिक माहिती पहा...

            

हा मला दोन चार दिवसापूर्वी सिल्लोड परिसरात आढळला होता. मला सुरुवातीला त्याची ओळख नव्हती नंतर त्याची ओळख झाली आणि त्याविषयी थोडक्यात माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे सविस्तर माहिती आपण गुगलवर सर्च करून पाहू शकता.


       लेखन व व्हिडीओ निर्मिती 

                श्रीकृष्ण बडकसर 

ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन शिक्षण कर्ज व्याज परतावा योजना... #Obc students #education loan

 ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन शिक्षण कर्ज व्याज परतावा योजना.....
ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी तसेच शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण कर्जावरील व्याज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ "शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना" सुरू होणार आहे.   ज्याचा फायदा ४०० विद्यार्थ्यांना होणार


 असून यासाठी  जवळपास ६ कोटीचा निधी तरतुद करण्यात आला आहे. याबाबत माहिती इ.मा.बहूजन कल्याण मंत्री श्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.


   या योजनेचा फायदा विद्यार्थ्यांना राज्य अंतर्गत , देशातील तथा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम यावरील शिक्षण करीता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे.


या योजनेची राज्य व देश अंतर्गत शिक्षण घेण्याची कर्ज मर्यादा ही  महत्त्तम १० लाख तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम शिक्षण कर्ज मर्यादा २० लाख इतकी असणार आहे.


      या योजनेत बॕकेचा जास्तीत जास्त १२ % व्याज परतावा नियमित कर्जफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना होणार आहे.


काव्यरंग या काव्यसंग्रहाचे प्रकाशन....#author #poet

 काव्यरंग हा माझा पहिलाच मराठी संग्रह...


 आपणासाठी देण्यात मला निश्चित खूप मोठा आनंद होत आहे . काव्यरंग जीवनातील अनेक रंगांचा स्पर्श करणारे आणि भाव व्यक्त झालेले आहे . 


यातील कविता निश्चितच आपल्या जीवनातील प्रत्येक बाजूला स्पर्श  करत आहे. जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाला सोबत असणारे, मानवी मनाला निश्चितच फलदायी अशी ऊर्जा देऊ पाहणाऱ्या या कवितांचा संग्रह या स्वरूपाने आपणापर्यंत पोहोचविण्यात येत आहे एक आत्मिक शांतता, सकारात्मक जीवन जगण्याची शक्ती, प्रेरणा तसेच चिंता  मुक्त जीवन होण्यासाठी तसेच आत्मविश्वास भरपाई होत नाविन्यपूर्ण  काव्यछटा आपल्या जीवनाला स्पर्श करून जाणार  आहे.

         देवाला साद घालणारे, मनाच्या कित्येक रंगछटा,निसर्गाशी नाती जोडून राहणारे , शुक्रतारा सह प्रेमधारा.....अशा अनेक बाबी काव्यलेखनातून प्रकट झालेल्या आहेत. निश्चितच आपणांस एक वेगळी अनुभुती यातून मिळणार आहे.


काव्यरंग" या काव्यसंग्रहाचे लेखन श्री प्रकाशसिंग किसनसिंग राजपूत यांनी केले आहे. माझा पहिला काव्यसंग्रह आता Flipkart वर उपलब्ध झाला असून या पूर्वी amazon वर आलेला होता तेथे 50 अतिरिक्त डिलेव्हरी  शुल्क होते मात्र आता flipkart free delivery  देत आहे.

Take a look at this Kavyrang / काव्यरंग on Flipkartकवी परिचय -


जन्म  ३० नोव्हेंबर १९८१ ला अजिंठा या गावी झाला. ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून सेवा बजावत असून, शाळेतील विविध उपक्रमामुळे  त्यांचा राज्यभर कार्यविस्तार होत त्यांनी डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र या सोशल मिडियातील समूहामार्फत डिजिटल शाळा, सोलार ऊर्जा वापर आकर्षक व सुंदर शाळा असा नवा आयाम स्वतःच्या शाळेला तर दिला सोबतच महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील मराठी भाषिक बेळगांव पर्यत ही चळवळ कित्येक वर्षापासून सुरु ठेवलेली आहे. हरित शाळा अभियान औरंगाबाद याचे अभियान गीत ही त्यांनी लिहिलेले आहे. याच बरोबर खामनदी शुद्धिकरण प्रकल्पावर लिहिलेले गीत ही उपयुक्त ठरले आहे.

         एकंदरीत तंत्रस्नेही , उपक्रमशिल व कवी अशी वेगळीच ओळख त्याची निर्माण झालेली आहे. 

जिल्हा परिषद शाळेत ही आता रोबोटिक्स..... #Robotics #goverment school

  


मुरुमखेडावाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनवली रोबोटिक्स कार ...


https://youtu.be/FfJ93rVAg2sग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही आता तंत्रज्ञान क्षेत्राची गोडी लागत आहे.  औरंगाबाद तालुक्यातील मुरूमखेडावाडी अतिशय दुर्गम डोंगर भागात असलेली एक प्राथमिक शाळा आहे. 

अवघड क्षेत्रात शाळा असताना सुद्धा येथे अनेक बदल पाहायला दिसून येतात.यापूर्वीही

  •  रोबोसेपियन डेमो ,
  • ड्रोन प्रात्यक्षिक, 
  • ऍडव्हान्स व्हिडीओ ट्रान्समीटर  , 
  • सोलार ऊर्जेवर २ वर्षापासून चालणारा आमचा अभ्यासकट्टा, 
  • करोना बाबतीत "हात पाय धुवू करोना वाडीबाहेर ठेवू",
  •  हरित शाळा अभियान अंतर्गतचे तयार झालेले घनवन व त्यास अत्याधुनिक पद्धतीने जलसिंचन,
  •  १००% डिजिटल व सुंदर शाळा अशी भव्य झेप शाळेने घेतलेली आहे.....
  • सुंदर माझी शाळा


 असे अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग घेण्यात आले आहे.

 याच बरोबर विद्यार्थ्यांनी श्री प्रकाशसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली रोबोट कार ची जुळवणी करत ही कार ठरवलेल्या ट्रॕकववर कशी चालते याचे प्रात्यक्षिक ही सादर केले आहे.

ही कार  स्वतः ठरलेल्या मार्गावर चालते आणि लवकरच यावरच आधारित एक उपयुक्त नवीन मॉडेल तयार करणार आहे. ज्याचा उपयोग निश्चितच एक मार्गदर्शक असा ठरणार आहे. अध्यक्ष विजयसिंग बालोद, उपाध्यक्ष गंगुबाई विष्णू बचाटे शाळेतील शिक्षक  श्री  प्रकाशसिंग राजपूत दिलीप आढे, , वैजिनाथ साबळे, काशिनाथ बचाटे, सुदाम बचाटे , धरमसिंग बालोद, गजानन साबळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत कौतुक केले आहे.

शाळा सुरु होत आहेत.... #School opening

 

 सुमारे दोन वर्षांच्या कालावधी नंतर ...

१ डिसेंबर २०२१ पासून प्राथमिक शाळेतील मुलांसह महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी पुन्हा शाळेत जाणार आहेत.


 सर्व विद्यार्थ्यांसाठी वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली.  राज्य शालेय शिक्षण विभागाकडून लवकरच कोविड प्रोटोकॉलसह तपशीलवार मानक कार्यप्रणाली  (S.O.P) जारी केली जाणार आहे..


 ऑक्टोबरपासून, 

  • शहरी महाराष्ट्रातील शाळा 8 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 
  • ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु झाल्या होत्या.


 'राज्य मंत्रिमंडळाने आज राज्यभरातील सर्व शाळांमध्ये १ ली ते ४ थी वर्ग पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.  बालरोग टास्क फोर्स आणि इतरांशी सलग चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.  आम्ही शाळा आणि पालकांसाठी तपशीलवार एसओपी तयार करण्यासाठी काही दिवस मागितले आहेत आणि म्हणून 1 डिसेंबरपासून ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे,शिक्षणमंत्री  म्हणाल्या .  या वर्षाच्या सुरुवातीला या टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली होती जेव्हा तज्ञांना भीती होती की संभाव्य तिसऱ्या लहरीमुळे मुलांवर परिणाम होऊ शकतो.

 कोविड-19 साथीच्या आजाराने राज्यात मार्च 2020 पासून शाळांमधील प्रत्यक्ष  वर्ग बंद केले होते.  12 जुलैपासून ग्रामीण भागात 8 वी ते 12 वीच्या वर्गासाठी ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्यात आले होते. 4 ऑक्टोबर रोजी शहरी भागातील शाळा 8 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या, तर ग्रामीण भागात इयत्ता 5 ते 7 वीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग पुन्हा सुरू झाले आहेत.


 शिक्षणमंत्री  म्हणाल्या  की, राज्य सरकारने निर्णय घेण्यापूर्वी दिवाळीनंतर 15 दिवस कोविड-19 परिस्थितीवर लक्ष ठेवले.  सणासुदीनंतर राज्यातील दैनंदिन प्रकरणे वाढू शकतात, अशी चिंता होती, परंतु सुदैवाने तसे झाले नाही.


 प्राथमिक विद्यार्थ्यांना शाळेत परत आणण्यात येणाऱ्या अडचणी मान्य करताना गायकवाड म्हणाले की, हे एक आवश्यक पाऊल आहे.  'इयत्ता 1 ते 4 मधील विद्यार्थ्यांना मास्क घालण्याची आणि शारीरिक अंतर राखण्याची सक्ती करणे कठीण आहे कारण ते खूपच लहान आहेत.  पण त्यांना पुन्हा शाळेत आणणेही आवश्यक आहे, कारण तज्ज्ञांच्या मते, गेल्या दोन वर्षांपासून ते घरीच असल्याने हळूहळू ते मुख्य प्रवाहातून बाहेर जाण्याची शक्यता आहे,असे गायकवाड यांनी सह्याद्री अतिथीगृहात पत्रकारांशी बोलताना सांगितले.  


 विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण देणे हे आमचे प्राधान्य आहे.  हे लक्षात घेऊन एसओपीमध्ये पालक आणि शाळा व्यवस्थापनाची भूमिकाही निश्चित केली जाईल,असेही त्या म्हणाल्या.  पुढील सहा दिवसांत, शाळा, पालक आणि मुलांना शारीरिक वर्गांमध्ये सुरक्षितपणे बदलण्यासाठी अनुकूल करण्यावर भर दिला जाईल, कारण जवळपास दोन वर्षांपासून वर्गखोल्या बंद आहेत, अशा त्या म्हणाल्या.

सदरक्षणाय २६/११ शहीदांना काव्यमय मानवंदना #motivational #pray

 

मुंबई वर झालेला अतिरेकी हल्ला आपल्या वीर जवानांनी जिवाची बाजी लावून अतिरेक्यांना यमसदनी पाठवले.... त्यांच्या या अफाट शौर्यास माझी काव्यमय मानवंदना.....

 🚨 🚓सदरक्षणाय...🚓🚨


सदरक्षणास मिळत नवं बळ,

खलनिग्रहणास बनत काळ,

या जन्मी होत अशी जनसेवा ,

लावुनी जीवाची बाजी करे देशसेवा...


दिवस रात्र  सदैव उभे राहती ,

शांती समाजास तेव्हाच लाभती,

येता संकट कसलेही जेव्हा,

खाकीत शोभूनी वीर हे लढती...

 

( सदरक्षणास मिळत नवं बळ,

खलनिग्रहणास बनत काळ,)


सक्त घडत यांचा असा पहारा,

वाटत कठोर जरी यांचा दरारा,

मन आतुन असतेच कोमल,

मानवी सेवेत स्वतःस ठेवे जहाल,

 

( सदरक्षणास मिळत नवं बळ,

खलनिग्रहणास बनत काळ,)


अतिरेक्यांशी लढला उभ्या छातीने,

दिसे फक्त जनकल्याण खाकीने,

धावूनी  देत जीव  ओवाळून,

प्रेम असे मायभुचे मृत्यूस कवटाळून...

 

( सदरक्षणास मिळत नवं बळ,

खलनिग्रहणास बनत काळ,)


      *🪶प्रकाशसिंग राजपूत🪶*

            औरंगाबाद 

       9960878457

किती छान होईल ना? जर अनाथ आश्रम व वृध्दाश्रम एकत्र केले तर....#orphan

 

किती छान होईल ना? जर अनाथ आश्रम व वृध्दाश्रम एकत्र केले तर....*


समाजात सदैव दोन घटक फारच दुर्लक्षित केलेले दिसून येतात. एक म्हणजे ज्यांना या समाजात नागरिक म्हणून तयार व्हायचे आहे ते तर दुसरे म्हणजे ज्यांनी या समाजासाठी खूप काही करून ठेवलेले असते परंतू त्यांचे असणे माञ समाजाला ओझे वाटू लागते. यावरून एक गोष्ट नक्कीच आपल्या लक्षात  आली असेल ती म्हणजे इथे चर्चा होत आहे ज्याला या जगात कोणीही नाही अशी अनाथ मुले व ज्याला या जगात सर्वजण असून ही परिस्थितीने झालेली परकी वृद्ध मंडळी ज्यांना त्यांचे कुटुंबातील लोक पहायला तयार नाहीत.
     आपण समाजात पहात असतो मुलांच्या  वाढदिवसाच्या दिवशी बरीच मंडळी या दोन्ही घटकांना एका दिवसा करिता का होईना परंतू प्रेम जिव्हाळा दाखवून परत येतात. परंतू याने काही यांचे जीवन बदलू शकत नाही .  


        एकीकडे देशाचे उज्वल भविष्य तर दुसरीकडे देशाच्या विकासाला हातभार लावून थकलेले खांदे*.

 एक सोशल मिडियावर एक फोटो याच बाबतीत वाचला व मन ते वाचून अगदी आतून पेटून उठले .खरंच जर या दोन्हीही घटकांना एकत्र आणले तर यांच्या आयुष्यात किती बदल होईल. मुलांना संस्कारांची , आदर्शवादी विचारांची व ममता, प्रेम जिव्हाळा याची शिदोरीच मिळेल. वयोवृद्धांना ही यांच्या सोबत नवचैतन्य व जीवन जगण्यातील नैराश्यावर उपाय मिळेल, नक्कीच आयुष्याच्या अखेरच्या वाटेवर काही दिवस खरे जगण्याचे समाधान त्यांनाही मिळून समाजात एक नवा बदल या दोन्हीहीच्या एकत्रित होण्यातून मिळेल.          अशा एका सामान्य बदलाने या दोन्हीही घटकावर सकारात्मक बदल होत असेल तर याकडे गांभीर्याने विचार करुन त्यासाठी महत्त्वाची पाऊले उचलण्याची गरज आहे. आपल्या समाजाला पूर्वीप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धतीचा विसर होत आहे त्यामुळेच वृद्धाश्रम हे नको असलेले परंतू एक कटु सत्य भारतीय संस्कृतीत निर्माण झालेले आहे. 

         अतिथी देवोभव !.... माननारे आपण भारतीय लोक घरातीलच लोकांना बाहेर काढू लागलो हे आपल्या भारतीय संस्कृतीचा होत असलेला ऱ्हास  नाहीतर काय? .

        अलिप्त विभक्त कुटुंब पद्धती ही खरंतर समाजात खूप मोठी दरी निर्माण करणारी ठरली आहे. यातूनच स्वार्थ निर्माण होत तीच बीजे पेरली जाऊ लागली. ३०-४० वर्षापूर्वी इतकी वाईट अवस्था आपल्या कुटुंब  पद्धतीची नव्हती कारण तेव्हा एकत्र कुटुंब पद्धत नांदत होती. मोठ्या प्रमाणात होत असलेले शहरीकरण हे कुटूंब पद्धतीला हानी पोहचविणारे ठरले आहे. सुखसोयी करीता माणूस शहराच्या वाटा जरी धरू लागला,  परंतू वृद्धाश्रम ही  समाजात निर्माण झालेली समस्या फार जटील बनून राहीली आहे. आयुष्यभर ज्या लेकरांसाठी आई वडील कष्ट करत राहीले त्यांनेच म्हातारपणी त्यांना असे परके करायचे हे किती कष्टदायी व मनाला त्रास देणारे आहे. त्यांच्या संपुर्ण आयुष्यातील हा वेदनादायी प्रसंगच असतो.

       अनाथ आश्रम मधील काही मुलांचे भाग्य उजळते ज्यांना दत्तक घेणारे पुढे सरकावतात परंतू प्रत्येक बालकाला हे भाग्य लाभत नाही. अशा सर्व बालकांना जर आश्रयरुपी या वृद्धांची वटवृक्षरूपी सावली मिळाल्यास त्यांच्यावर पडलेल्या संस्काराने नक्कीच त्यांचे ही भाग्य हे उजळून येईल पर्याने समाजाला उत्कृष्ट नागरिक ही लाभतील .  आई वडील नसले तरी असंख्य आजोबा आजी हे यांचे पालक बनतील तेव्हा यांना अनाथ बनविणारा देव ही स्वतःच्या निर्णयाचा विचार करु लागेल.

      अनाथ आश्रम व वृध्दाश्रम एकत्र करण्याच्या दिशेने समाजातील सर्व घटकांनी सकारात्मक पाऊल उचलणे महत्त्वाचे होईल या बाबतीत राजकीय , सामाजिक नवचैतना निर्माण होत भारतीय संस्कृतीच्या उत्कर्षाला प्रेरणा तर नक्कीच मिळेल आपण खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीला जोपासणारे नागरिक म्हणून अभिमानाने या समाजात जगू शकू. 


          उत्कर्षाचा पेटवू नव ज्वाला,
          अनाथ न राहील येथील बाळा,
         आधाराची लाभेल एक काठी,
        वृद्धपणी सुटेल परकेपणाच्या गाठी....        प्रकाशसिंग किसनसिंग राजपूत 

                 

 आपल्याला काय वाटते काॕमेंटमध्ये अवश्य लिहा....

रसायन जगण्याचे..... सुंदर कविता #new poem #marathi poem

 

 रसायन जगण्याचे..... सुंदर कविता*"काव्यरंग " हा माझा  काव्यसंग्रह अॕमेझान व Flipkart वर उपलब्ध अवश्य खरेदी करा.... आंतरराष्ट्रीय ISBN दर्जा प्राप्त ....*

*रसायन जगण्याचे...*आयुष्य  हे निर्भर नात्यांवर,
बनत रसायन जगण्याचे,
फौल ठरते कधी सार्थक,
निभाव होऊन साफल्याचे,


तरीही कोणी कसं जगावं,
अजबं ठरत हे रसायन,
पीडा या मनाच्या कशाच,
सरत्या क्षणावर अच्छादन,


तोडगा नसे गुंतागुंतीचा,
प्रभाव तुमचा विसरून,
जगी हिनवावं का? कुणाला,
तुमच्या प्रगतीस अडवून..,


शल्य कधी वलय नवे जीवनी,
विसंगत नातं हे जुळवून,
चित्कार ना येत काळजाचा,
घडतोय जीवन असं विसंबून,


भावनेला ही का सारावं,
विनाव नवा बंध  रंगवून,
नात्याबाहेर ही मन रमावं,
जगावं जरा दुःख  हरवून.....   *प्रकाशसिंग राजपूत*

          औरंगाबाद 
       9960878457 

*"काव्यरंग " हा माझा  काव्यसंग्रह अॕमेझान व Flipkart वर उपलब्ध अवश्य खरेदी करा.... आंतरराष्ट्रीय ISBN दर्जा प्राप्त ....*

😇भुरळ फक्तच सगळी ......😊#poem

 😇भुरळ फक्तच सगळी ......😊आले कसे दिवस हे न्यारे,

न मिळे भाग्य अशाप्रकारे 

तोडून आता अकलेचे तारे ,

पेटवू पहात हे रान सारे.....फक्तच राहिली चिंता,

न उजळे नशिब हीनता,

वाढेल ताटावर खाऊन ,

भुक न मिटे पोटजरी भरता,मनात लागेल काजळी,

ओळख स्वतःची आगळी,

गाडा चालण्या चाक उलटा,

फिरुन भुरळ फक्तच सगळी,हुशारी सारी स्वार्थ साधे,

साधू रुपात डाकू साजे,

सोंग घेत हळू विंचवाचा दंश ,

पुसणार काय कुणा कितीही माजे...😊✒️ *प्रकाशसिंग राजपूत*✒️

          औरंगाबाद

कलह...


*कलह...*


होता कलह  मनाचा,
जीवन होत त्रासाचा,
मनाची व्यथा सारी,
होणार कुठे व्यक्त तरी,


होत ऱ्हास आपुलकीचा,
संबंध तुटत जगण्याचा,
जगण्यास येत काळोख,
मिटेल ही आता ओळख,


कहर होत विचारांचा,
जहर साऱ्या चिंताचा,
हुरुप जात निभावण्या,
बळ न भाव टिपविण्या,


सोडत वर्ण जीवना,
चाकोरी समाजाची मावेना,
भरपूर झाला कलह,
मिटेल का जीवनाचा दाह ....


     *प्रकाशसिंग राजपूत*


आमच्या गीत अलंकार या युटूब चॕनलला सबस्क्राईब करा...


मी ... मी कचरा बोलतोय #Essay writing #निबंध लेखन

"मी कचरा बोलतोय !!!...."उडून जातो कधी वाहून जातो नाहीतर धूर बनून उंच आभाळी ही जातो.....माझ्या अशा अवस्था होतात बरं का? 
    खूप दिवसांनी मन हलके करायचे होते ,आज संधी भेटली तेव्हा मांडावी वाटली माझीही व्यथा.....
    मी दुसरा तिसरा कोणी नव्हे तर मी आहे कचरा...... हो मी आज माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी तुमच्याशी संवाद साधत आहे. माझा जन्म कसा होतो ते सांगतो . तुम्ही मला खूप आवडीने विकत आणता मग काही दिवसाचे कौतुक ही करता.... गरज सरो व वैद्य मरो असंच माझं ही होऊन जाते. लवकरच हवा हवासा असलेला मी नकोसा होतो व मग मला माझ्या या अवतारात जन्म मिळतो तो म्हणजे कचरा.....


 माणुस असा प्राणी आहे तो अल्पसंतुष्ट राहतो. तो कित्येकदा नविन वस्तुच्या हव्यासा पाई चांगल्या वस्तूंना फेकने सुरु करतो. मग भेटेल त्या जागी नको असलेल्या वस्तूना फेकून जातो.
     मानवात असलेली ही कला तर नाही ना?   कलेच्या जोरावर अनेकविध वस्तूची निर्मिती करु शकला हे मात्र खर आहे. पृथ्वी तलावरील लाखो जीवात म्हणून तर श्रेष्ठ बनून आहे. 
      अग्नीच्या शोधापासूनच तर सुरु झाला निसर्ग पतनाचा सारा काही खेळ.आज निर्माण झालेले वायुप्रदुषण उच्चतम स्तरावर येऊन पोहचले आहे. त्यात भर पडते ती म्हणजे मला जाळून निसर्गात माझ्या नकोशा विषारी अवतारास वायु स्वरूपात मिसळून निष्पाप जीवांच्या श्वसनात माझा न कळत प्रवेश होऊन जातो.
    विपरीत असे घडत जाते मी फक्त पहात राहतो. पावसाळा हा ऋतू खरं तर धरणीच्या बहरण्याचा ऋतू परंतू मला कित्येक ओढे, नदी यात मुक्त पोहण्यास टाकून दिल्या जाते.  जल यही जीवन मग मी ही त्यात मिसळून माझे अस्तित्व टिकवून तग धरून स्वतःला सारत  राहतो. 

      होवो किती हा समर,
    कचरा मी आज येथे अमर....

माणसाकडे वेळ नाही म्हणून तर माझे आज साम्राज्य वाढत आहे. घाईघाईने  कुठेही कसेही मला टाकले म्हणजे तो जबाबदारीतून मुक्त होऊन लगबगीनं निघतो परत नव्या उठावास....
     खरं तर मी माझ्या या अवस्थेला खूप कंटाळून गेलोय माझ्या मुळे निष्पाप जनावरेमाझे  प्लास्टिकचे रुप खाऊन मरत आहेत. माझ्या धूराने पर्यावरण दूषित होऊन निसर्ग हानी होत आहे. असंख्य नाले तुडुंब भरून वाहने थांबून जात आहेत. नको नको असलेल्या स्वरूपात मला राहून या भुतलावर असह्य त्रास सोसावा लागत आहे.
  मानवी जीवन आज कचरा स्वरूपाने सर्वत्र व्यापून गेलेले आहे.त्याच्या प्रत्येक कृतितून निरंतर कचरा रुपाने आमचा जन्म होत आहे. विराट असे आमचे होणारे साम्राज्य पाहून निसर्ग आज चिंतेत पडला असणार यात तिळमात्र शंका नाही. 
      मानवाने फक्त  एकच करावे ते म्हणजे कचरा टाकातांना ओला , सुका वेगळा करावा इलेक्ट्रॉनिक्स, औषधी रसायने याचे ही योग्य वर्गिकरण करुन. घंटा गाडीत मला पाठवावे व तेथून मला समृद्धीच्या वाटेवर पोहचवावे. मी कंपोस्ट बनून निसर्गात शिवारात वनस्पतीमध्ये डोलू  लागेल. प्लास्टिकचे पुनर्रवापर होऊन मला परत कलात्मकता मिळेल.मानवी जीवन भरभराटीचे होतांना सोबत जीव सृष्टीचे ही जतन होणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. ही वसुंधरा सदैव पृथ्वी स्वच्छ व निर्मळ राहीली आहे व तिचे सुंदर रूप कधीही कमी होऊ नये . करोडो जीवांना येथे आधार मिळत आहे. तो कधी हिरावून जाऊ नये. यासाठी संपुर्णता मानवाचे दायित्व बनते की त्याने यासाठी निश्चित सकारात्मक पुढाकार घेऊन होणारी ही विनाशाची शृंखला खंडित करावी. 
व्यथा तर मांडली पण जाता जाता परत एक सांगून जातो. 

फुलेल परत धरती ही परत आनंदाने ,
विल्हेवाट कच-याची योग्य लावल्याने,
माणसा सोड रीत तुझी सदा फेकण्याची,
कर वर्गीकरण आमचे नांदेल तु सुखाने.....
निबंध लेखन 

प्रकाशसिंग किसनसिंग राजपूत 
सहशिक्षक 

जि.प.प्रा.शा.मुरुमखेडावाडी ,
औरंगाबाद 
9960878457 

खंत काळाची.... #poem

😢😢  *खंत काळाची* 😢😢


सुटला पदर मित्रांनो या जीवनाचा,
उरला नाही अर्थ या क्षणाचा,
सुटली साथ कहर या दाहाचा,,
करावं कायच सुटला हात मैत्रीचा,


आनंदाची गात होता गाणी,
नाही राहत होती गऱ्हाणी,
हर्ष येत व्यक्त होई मनी भाव,
खरेपणावर मृत्यूचा पडला घाव,


विसरणे हे दुःख जगी अशक्य आता,
कायच खेळ देवा मांडला होता,
परीक्षा ही अशी कशी या जीवनाची,
अश्रू दाटत वेळ आली त्रासाची,


अंधार या दिवशी कसाच पसरला,
होईल हा अनर्थ कधीही न जाणला,
ध्येर्य अनेकांचे आज पहा तुटले,
काळजात दुःख मोठे पसरले ,


तोडला तार या आयुष्याचा,
विसर न होणार या प्रसंगाचा,
हारले सारेच खंत या काळाची,
शक्ती लाभो या दुःखाला झेलण्याची...


              प्रकाशसिंग राजपूत