काळाची होत सदा गीनती,
माझे नशीबच ठरतेय असहाय्य ,
हुरुप ना हे निरंतर चालेल,
विश्वास गमवित उरला नाही पर्याय,
बिकट अशा चक्रात फसलोय,
जीवनी मार्ग उम्मेदिचा शोधतोय,
अपयशाची काटे ही टोचत आहे,
तऱ्हा या जगण्याची सोसतोय,
सुखात वाटा घेणारी नाते ही हिरावत,
या क्षणात ती ही कशी लृप्त होत आहे,
स्वार्थ प्रत्येकाचा इथेच श्रेष्ठ आहे,
वेळ हाच आता गुरु बनत आहे,
पाठ खरेपणाचा शिकत खास,
प्रसंग हा आला वादळ बनत,
तर्क सारे आता वाहून हे गेले,
वादळ क्षमता मी ही स्थिरावत...
🖋️प्रकाशसिंग राजपूत 🖋️
औरंगाबाद
9960878457